Sanquelim: ..हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती! साखळीतील 'त्या' गरीब महिलेला मिळाला ‘आधार’

Goa CM relief fund: गोकुळवाडी-साखळी येथील शालन नाईक या गरीब महिलेच्या घराची भिंत तसेच घराचा भाग कोसळल्यामुळे तिच्‍यावर मोठे संकट ओढावले होते.
Sanquelim, CM Pramod Sawant
Sanquelim, CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गोकुळवाडी-साखळी येथील शालन नाईक या गरीब महिलेच्या घराची भिंत तसेच घराचा भाग कोसळल्यामुळे तिच्‍यावर मोठे संकट ओढावले होते. त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्‍यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा धनादेश नाईक यांच्‍याकडे सुपूर्द केला.

साखळीतील प्रभाग क्र. ६ मधील गोकुळवाडी येथील शालन श्रीकांत नाईक यांच्या घराची भिंत व अर्धा भाग कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. या घटनेची कल्पना स्थानिक नगरसेवक विश्रांती पार्सेकर व माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी ता घराची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.

Sanquelim, CM Pramod Sawant
Sanquelim: लोकांशी जवळून ‘कनेक्ट’ व्हा! मुख्यमंत्र्यांनी नगरसेवक, सरपंच, पंचांचा घेतला वर्ग

या आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर करून आठ ते दहा दिवसांत प्रभावी पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्यात आली. मदतीचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शालन नाईक यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांचे पुत्र रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांची उपस्थिती होती. दरम्‍यान, या मदतीबद्दल शालन नाईक यांनी समाधान व्‍यक्त करून मुख्‍यमंत्र्यांचे आभार मानले.

Sanquelim, CM Pramod Sawant
Sanquelim: साखळी पालिकेचा अभिनव निर्णय! वापरणार विहिरींचे पाणी; बिलाचे 60 हजार रुपये वाचणार

समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी फायदेशीर ठरत आहे. आतापर्यंत अनेकांनी या निधीचा लाभ घेताना आपल्यावरील संकट काही प्रमाणात दूर करण्यात मदत मिळवली आहे. हे सरकार गरीब व होतकरू लोकांचे आहे. लोकांनी सरकारच्या या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com