Sanguem Market Latest News Dainik Gomantak
गोवा

Sanguem: रस्त्यावर चिखल, सांडपाण्याच्या दुर्गंध आणि तिथेच भरतोय आठवडी बाजार; सांगेतील दुरावस्था, विक्रेते-ग्राहक हैराण

Sanguem Market: पालिकेने या बाजारासाठी शेड बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या बाजारात कोणतीच सुधारणा झालेली नाही.

Sameer Panditrao

सांगे: येथे दर बुधवारी पालिकेचा आठवडी बाजार सध्या विविध संकटांनी ग्रासला आहे. येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत भरतो, पण सध्या पावसामुळे लोकांना चिखलातून बाजारहाट करावी लागते.

पाच वर्षांपूर्वी हा बाजार पालिकेच्या अंतर्गत रस्त्यावर भरत होता. त्यावेळी वाहन चालकांना अडथळा होत असल्यामुळे हा बाजार मासळी मार्केटला टेकून उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेवर भरविण्यात येऊ लागला. त्यावेळी पालिकेने या बाजारासाठी शेड बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या बाजारात कोणतीच सुधारणा झालेली नाही. ऊन पावसात बसून व्यापाऱ्यांना व्यापार करावा लागतो.

आज जिथे बाजार भरला जातो ती जागा पालिकेच्या मालकीची असून नगराध्यक्ष संतीक्षा गडकर यांच्या प्रभागात मोडते. त्यामुळे लोक पालिका व नगराध्यक्षांना दुषणे देत आहेत. बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखलातून फिरावे लागते. अर्धा दिवसाचा हा बाजार असला तरी गलिच्छ वातावरणात खरेदी विक्री केली जाते.

नाइलाजाने ग्राहकांना चिखलात बसून भाजी व इतर साहित्य खरेदी करावे लागते. तसेच मासळी मार्केटमधील सांडपाणी गटारातून वाहत असल्यामुळे विक्रेत्यांना व ग्राहकांना कायम दुर्गंधी सहन करावी लागते. उपजिल्हाधिकारी कार्यालयाखाली गावठी भाजी विक्रेत्यांसाठी खास सोपे तयार करण्यात आले होते, पण तिथे गळती होत असल्यामुळे विक्रेत्यांना उघड्यावर बसून विक्री करावी लागते.

पालिकेने लक्ष द्यावे

गेल्या पाच वर्षांत विक्रेत्यांना केवळ आश्‍वासनेच मिळाली आहेत. पालिका मंडळाचे हे शेवटचे वर्ष आहे, त्यामुळे या बाजाराकडे हे पालिका मंडळ लक्ष देणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मासळी मार्केटनजीक शेड उभारल्यास विक्रेते व ग्राहकांच्या ते सोयीचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT