Sanguem: शेतकरी फसला पाण्यात! अवकाळीमुळे पिकाचे नुकसान, जनावरांना चाराही नाही; बळीराजावर उपासमारीची वेळ

Goa Agriculture Loss: अवकाळी पावसामुळे हातातोंडावर आलेला घास हिरावून घेतला गेला असून शेतकऱ्याच्या शेतातच पिकलेले भात उगवू लागल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.
Sanguem Agriculture Loss
Sanguem FarmersDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: अवकाळी पावसामुळे हातातोंडावर आलेला घास हिरावून घेतला गेला असून शेतकऱ्याच्या शेतातच पिकलेले भात उगवू लागल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.

संपूर्ण सांगे भागात हीच परिस्थिती असून उभे भात पीक पावसाच्या पाण्याने नासाडी झाल्यामुळे एका बाजूने कष्टकरी शेतकरी लुबाडला गेला, तर दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या गुरा ढोरांना मिळणारे भाताचे गवत कुजल्याने बळीराजावर उपासमारी होण्याची वेळ आली आहे.

इतका पाऊस कधीच पडला नसल्याचे सर्वच शेतकरी सांगतात. एक दोन दिवस पाऊस पडायचा पण शेतकरी पूर्णपणे संकटात पडले इतका पाऊस धो धो कोसळल्यामुळे गुरा ढोराबरोबर शेतकरी कुटुंबाला पुढील सहा महिन्यांची बेगमी आता कोण देणार हा प्रश्न प्रत्येक शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

Sanguem Agriculture Loss
Sattari: कच्ची फळे कुडतरली, काजू बिया फस्त; सत्तरीत जनावरांकडून पिकांचा फडशा; शेतकऱ्यांच्या व्यथांकडे दुर्लक्ष

नुकसान भरपाई म्हणून कृषिखाते मूळ किंमतसुद्धा देत नसल्याने कित्येक शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे करणे नापासंती व्यक्त केली आहे. शेतकरी म्हणतो सरकार देऊन देऊन किती देणार. कृषी खात्याने शेतकरी पावसाने बुडाला आहे त्यांना नुकसान भरपाईच्या नावाने कोणी लुबाडू नये.

Sanguem Agriculture Loss
Goa Rain: ‘अवकाळी’चा धुमाकूळ! पावसाळापूर्व कामे खोळंबली; 'शाकारणी'साठी भाव वाढला

मशागतीस होतो उशीर

शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो तो मुळात उशिरा केला जात असल्यामुळे मशागत करून रोप लावीपर्यंत जानेवारी महिना ओसरत असतो म्हणून पुढे पीक निर्माण होईपर्यंत मे महिना संपतो. त्यात अवकाळी पाऊस पडल्यास संकटाला तोंड देण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. जलसंपदा खात्याने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाणीपुरवठा केल्यास मे महिन्याच्या सुरुवातीला भातपीक तयार होऊ शकते अशी प्रतिक्रिया संजय मापारी यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com