Pramod Sawant Government in Goa Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंत सरकारमध्ये सासष्टीला स्थान नाहीच

नावेलीत जागा जिंकत इतिहास रचला, मात्र उल्हास तुयेकरांना मंत्रिपदाची संधी नसल्याने नाराजी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. प्रमोद सावंत यांच्यासोबत इतर 8 मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला आहे. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. मात्र या मंत्रिमंडळात सासष्टी तालुक्याला प्रतिनिधीत्वच दिलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सासष्टी तालुक्यात आठ मतदारसंघ येतात. मात्र पहिल्यांदाच सासष्टी तालुक्याला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही, दुसरीकडे फोंडा तालुक्याला मात्र सर्वाधिक 3 मंत्रिपदं मिळाली आहेत. सासष्टी हा नेहमीच काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या काही काळापासून सासष्टीत काँग्रेसचं वर्चस्व कमी होताना दिसत आहे. गोवा हे छोटं राज्य असल्याने आठ मतदारसंघ येणाऱ्या सासष्टी तालुक्याला प्रत्येक सरकारमध्ये स्थान मिळतंच. मात्र यावेळी सासष्टीवर अन्याय झाल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होताना दिसत आहे.

आतापर्यंत सासष्टी तालुक्याने गोव्याला चार मुख्यमंत्री दिले आहेत, जे कोणत्याही अन्य तालुक्यापेक्षा जास्त आहेत. मात्र यावेळी सासष्टीत वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपने नावेलीत जागा जिंकत इतिहास रचला खरा, मात्र उल्हास तुयेकरांनाही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सासष्टी तालुका सरकारमधील सहभागापासून वंचित राहिल्याचं चित्र आहे. कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी झालेल्या शपथविधीत त्यांना स्थान मिळालं नाही. आता त्यांच्या मंत्रिपदाचं भवितव्य हे पुढील मंत्रिमंडळ विस्तारावर ठरणार आहे.

गोव्यात 2007 साली सासष्टी तालुक्याला सर्वाधिक 6 मंत्रिपदं मिळाली होती. दिगंबर कामत (Digambar Kamat) मुख्यमंत्री असताना सासष्टी तालुक्याला सरकारमध्ये प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली होती. यानंतर 2012 साली भाजपला बहुमत मिळालेलं असतानाही नावेलीचे अपक्ष आमदार आवेर्तानो फुर्तादो यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली होती. 2017 साली भाजपचं संख्याबळ 13 वर आलं आणि सहा तालुक्यात भाजपला (BJP) एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र तरीही भाजपने प्रादेशिक पक्षांच्या साथीने आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं ज्यात सासष्टीला सरकारमध्ये स्थान मिळालं. सावंत सरकारमध्ये पेडणे, सांगे, आणि धारबांदोडा तालुक्यांनाही प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही, ज्याठिकाणी भाजपच्या जागा आलेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT