Iran Celebration: "ट्रम्प यांच्या पतनाची सुरुवात झाली!", मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर इराणमध्ये जल्लोष; हजारो लोक उतरले रस्त्यावर VIDEO

Donald Trump Midterm Defeat Iran Celebration: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या धक्कादायक पराभवानंतर इराणमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला.
Donald Trump Midterm Defeat Iran Celebration
Iran CelebrationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump Midterm Defeat Iran Celebration: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या धक्कादायक पराभवानंतर इराणमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्या युद्धजन्य धोरणांविरोधात दिलेला हा स्पष्ट संदेश असल्याचे सांगत इराणची राजधानी तेहरानमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष साजरा केला.

1979 मधील अमेरिकन दूतावासावरील कब्जाच्या घटनेच्या आठवणी जागवत लोकांनी ट्रम्प यांच्या पोस्टर्सची जाळपोळ केली. ट्रम्प यांनी इराणवर (Iran) सातत्याने अन्याय केला असून, अमेरिकन जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या जुलमी कारभाराचा हिशोब चुकता केला; आता ट्रम्प यांच्या पतनाची सुरुवात झाली, अशी घणाघाती टीका आंदोलकांनी केली.

Donald Trump Midterm Defeat Iran Celebration
Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

या राजकीय घडामोडींवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी 'X' वर पोस्ट करत ट्रम्प सरकारला थेट इशारा दिला. जर ट्रम्प यांनी आपल्या जनतेच्या इच्छेकडे दुर्लक्ष करुन इतर देशांच्या दबावाखाली काम करणे सुरु ठेवले, तर त्यांना इराणला नकार देण्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Donald Trump Midterm Defeat Iran Celebration
Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

दुसरीकडे, इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी मात्र या निकालांनंतर अमेरिकेचे इराणविरोधी धोरण बदलेल अशी अपेक्षा ठेवणे मोठी गैरसमजूत असल्याचे म्हटले. अमेरिकेने पुन्हा लष्करी कारवाईचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देत त्यांनी सैन्याला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचे स्पष्ट केले.

Donald Trump Midterm Defeat Iran Celebration
France Protest: ''हा तर फ्रान्सवर ताबा मिळवण्याच्या मोठ्या कटाचा भाग'', वाढत्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक विधान; पॅरिससह प्रमुख शहरात अराजकता

फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये लष्करी संघर्ष सुरु असून, जून 2026 नंतर दोन्ही देशांमध्ये कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. कतार मध्यस्थीचा प्रयत्न करत असला, तरी इराणने मांडलेला 7 कलमी शांतता प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने फेटाळून लावला. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी आणि वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक ठप्प झाली असून, दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम असल्याने मध्य पूर्वेतील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.