तृणमूल काँग्रेससोबत जाणं ही मोठी चूक : चर्चिल आलेमाव

तृणमूलही आपल्या पराभवास जबाबदार, चर्चिलकडून निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पराभवावर भाष्य
Churchill Alemao
Churchill AlemaoDainik Gomantak

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर चर्चिल आलेमाव यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये जाणे ही आपली मोठी चूक होती. तृणमूलही आपल्या पराभवास जबाबदार आहे, मात्र त्यावर बोलायचे नाही, अशा शब्दात चर्चिल आलेमाव यांनी आपली नाराजी उघड केली.

Churchill Alemao
चर्चिल आलेमाव यांना पुन्हा मतदानयंत्रे हॅक होण्याची भीती

माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस नेते चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) दाखल होणं ही आपली फार मोठी चूक होती, अशा शब्दात पक्षावर निशाणा साधला आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाकडूनही मोठ्या चुका झाल्या आहेत. मात्र त्यावर मी बोलू इच्छित नाही असं म्हणत आपल्या पराभवाचं खापर पक्षावर काढलं आहे. या निवडणुकीत चर्चिल आलेमाव आणि मुलगी वालांका आलेमाव दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.

यापूर्वी आलेमाव कुटुंबातील चारही उमेदवार 2012 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. मतदानयंत्रात केलेल्या मतांच्या फेरफारामुळे पराजित झाल्याचा कांगावा करणाऱ्या चर्चिल आलेमाव यांना यंदाच्या निवडणुकीत असाच प्रकार होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे केवळ 3 व्हीव्हीपॅट मशीन मधील स्लिप्सची मोजणी न करता सर्व मशीनमधील स्लिप्सची मोजणी करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

Churchill Alemao
आलेमाव भगिनींवर पैसे वाटपाचा आरोप, नावेलीत तणाव

चर्चिल आलेमाव यांनी 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. 2017 साली विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधीत्व करतानाच निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसची वाट धरली होती. मात्र तृणमूलची साथ त्यांना पचनी पडली नसल्याचं त्यांच्या नाराजीवरुन स्पष्ट दिसत आहे. यापूर्वी लवू मामलेदार यांनीही अवघ्या काही दिवसात तृणमूलची साथ सोडत काँग्रेसवासी (Congress) होण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचाही मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी पराभव केला आहे. दुसरीकडे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही काँग्रेस सोडून तृणमूलची वाट धरली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणूक जिंकत भाजपला (BJP) पाठिंबा दिल्याने त्यांना मंत्रिपदही देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com