Som Yag Yadnya 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023 Goa: 'वेदीकरण', 'प्रवर्ग्य'; असा पार पडला अग्निष्टोम महासोमयागाचा तिसरा दिवस

म्हापसा येथे विश्वकल्याणार्थ आयोजित या महासोमयागाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे.

Pramod Yadav

गोमन्तक- सकाळ समूह आयोजित अग्निष्टोम महासोमयाग म्हापसात काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थानच्या परिसरात सोमयाग सुरू आहे. विश्वकल्याणार्थ आयोजित या महासोमयागाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. आज यज्ञाच्या तिसऱ्या दिवशी देखील विविध विधी पार पडले. यात प्रामुख्याने 'वेदीकरण' आणि 'प्रवर्ग्य' असे दोन विधी पार पडले.

Som Yag Yadnya 2023 Goa

'वेदीकरण' विधीमध्ये पश्चिम दिशेला यजमानाचे 30 हात इतके अंतर, त्याचप्रमाणे पूर्व भागात यजमानाचे 24 हात एवढे अंतर आणि दक्षिण व उत्तर 36- 36 हात अंतर घेतले जाते. अशा चौकोनी पद्धतीने सोमयागाच्या वेदीची निर्माण केले जाते.

Som Yag Yadnya 2023 Goa

वेदीकरण हा विधी करताना सर्व रूत्विज संपूर्ण जागा मोकळी करतात. या भागात काही झाडे असल्यास ती मंत्रोच्चार करून तोडून काढली जातात. संपूर्ण जागा जज्ञ करण्यायोग्य केली जाते.

Som Yag Yadnya 2023 Goa

त्यानंतर त्यावर शेणंकाला टाकून 'धिष्ण्या' नावाचे ओटे तयार केले जातात. अशा प्रकारे वेदीकरणाचे कार्य केले जाते.

Som Yag Yadnya 2023 Goa

तिसऱ्या दिवशी देखील दुसऱ्या दिवशी सांयकाळी पार पडला त्याच प्रकारचा 'प्रवर्ग्य' विधी पाडला.

Som Yag Yadnya 2023 Goa

अग्निष्टोम् महासोमयागाला आज मोठ्या प्रमाणावर भाविकांनी उपस्थिती लावली होती. रविवारी सुरू झालेला महासोमयाग 10 फेब्रुवारीपर्यंत म्हापसा येथे सुरू राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: ना घरका, ना घाटका!

Monsoon: जून महिन्यातच 'एल निनो'चा थेट वार! कोरड्या वाऱ्यांनी रोखला मान्सूनचा रस्ता; देशातील 9 राज्यांमध्ये पाण्यासाठी उडणार हाहाकार?

Vadodara Jarod Highway Accident: वडोदरा-जरोद हायवेवर काळजाचा थरकाप! लक्झरी बस आणि ट्रकच्या धडकेत 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 31 गंभीर जखमी

Kali Tiger Reserve: रविवारी मिळाली टीप, मध्यरात्री पडली धाड! काळी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची शिकार; 'कदंब'चा कर्मचारी वन खात्याच्या जाळ्यात

Goa Tree Cutting: "पहिले काम झाडे वाचवणे, सरकारी मागण्यांना होकार देणे नाही!" हायकोर्टाने वृक्ष प्राधिकरणाची केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT