Som Yag Yadnya 2023 Goa: महासोमयागास प्रारंभ, पहिल्या दिवशी प्रसन्नतेची अनुभूती

Som Yag Yadnya 2023 Goa
Som Yag Yadnya 2023 GoaGomantak Digital

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

म्हापसा : ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदांमधील मंत्रांचे पठण.... ऊर्जा वाढवणारे सकारात्मक वातावरण, सात्विक भोजन, शेणाने सारवलेले मंडप व्यवस्था.. अशा प्रसन्नतेची अनुभूती रविवारी गोमंतकीयांनी घेतली. निमित्त होते गोमन्तक- सकाळ समूह आयोजित अग्निष्टोम महासोमयाग. म्हापसात काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थानच्या परिसरात हा सोमयाग सुरू आहे.

Som Yag Yadnya 2023 Goa
Som Yag Yadnya 2023: सोमयाग म्हणजे काय?

सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मनशांती तसेच आध्यात्मिक समाधानासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अग्निष्टोम महासोमयागाचं आयोजन करण्यात आलंय. या यज्ञ उत्सवात पुणे, कोल्हापूर, हैदराबाद, सातारा, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणांहून १७ गुरुजी आले आहेत.

असा पार पडला पहिला दिवस

> सकाळी ८ वाजता सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या हस्ते विश्वकल्याण, रोगमुक्त परिसर, सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी तसेच आध्यात्मिक समाधानासाठी संकल्प करून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अभिजीत पवार यांच्याच हस्ते यज्ञस्थळी गणपतीपूजन, पुण्याहवाचन झाले. या विधीनंतर त्यांनी या अग्निष्टोम महासोमयागाचे यजमानपद हे म्हापशाचे ग्रामपुरोहित सोमयाजी सुहोता दीपक दीक्षित आपटे आणि त्यांच्या पत्नी समृद्धी यांच्याकडे सोपविले. पुरोहितांच्या उपस्थितीत प्राग्वंश मंडपात यज्ञस्थळी मधुपर्क, अग्निमंथन, कुष्मांड, प्रवर्गसंभरण, दीक्षणीयेष्टि व दीक्षा ग्रहण झाले.

> दीक्षणीयेष्टि म्हणजे काय?

पहिल्या दिवशी दीक्षा देण्याकरिता यज्ञ केला जातो.  यानंतर यजमानांना केशवपन, स्नान, भोजनानंतर यज्ञदीक्षेकरिता सिद्ध केले जाते. यजमानांनी भोजन केल्यानंतर यज्ञ जोवर अवभूत होत नाही तोवर अन्नग्रहण करता येत नाही. रविवारी यजमानांनी केलेल्या भोजनास दीक्षा भोजन असे म्हणतात.

> दीक्षा वस्त्र म्हणजे काय?

यजमानांनी क्षुमा या नावाच्या वनस्पतीच्या किंवा रेशमाच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र परिधान करुन दीक्षेचे ग्रहण केले. क्षौम वस्त्र हे सोमदेवतात्मक असते, असे शास्त्रात म्हटलंय.  हे वस्त्र म्हणजे सोमदेवतेचे शरीर असून क्षौम वस्त्र परिधान केले असता दीक्षा ग्रहण करणारा तो यजमान सोमवदेवतेला प्राप्त होते, असं सांगितले जाते.

> यजमानांचा 'डाएट प्लान'

यजमान या यज्ञ उत्सव संपेपर्यंत भोजन करणार नाही. तसेच यज्ञमंडपाबाहेर जाणार नाही. या काळात ते झोपणार देखील नाहीत. या कालावधीत ते दूग्धप्राशन करतील. यामुळे त्यांच्यात ऊर्जाही राहणार तसेच त्यांना यज्ञ मंडपाबाहेरही जावं लागणार नाही.

Som Yag Yadnya 2023 Goa
Som Yag Yadnya 2023: सोमयज्ञामुळे प्रदूषण कमी होते?, वाचा Research

मंडप व्यवस्थेविषयी

यज्ञस्थळी प्राग्वंश मंडपाची उभारणी केली असून गार्हपथ्य, दक्षिणाग्नी, आहवनीय व वेदी अशी चार होमकुंडे तयार केली आहेत. जी शेणाने सारवलेली आहेत. यज्ञस्थळी अश्व, गाय तसेच शेळी आणली आहे. महासोमयागानुसार त्यांची विधीवेळी पूजा-अर्चा केली जाते. तसेच नारळांच्या झावळ्यापासून दोन कुटेरी बांधली गेली आहेत. ही कुटेरी पत्नीशाला म्हणून ओळखली जातात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com