Sahitya akadami Dainik Gomantak
गोवा

अभिमान! मराठीत बाविस्कर, कोकणीत पेर्नाळ यांना ‘साहित्य अकादमी’; ‘काळ्यानिळ्या रेषा’ व ‘कोंकणी काव्यें’ पुस्‍तकांचा गौरव

Sahitya Akadami Awards 2025: देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दिले जाणारे २०२५चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दिले जाणारे २०२५चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी विभागात राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेला तर कोकणी विभागात कर्नाटकातील कवी एच्चेम पेर्नाळ (हेन्री इग्नेशियस मेन्डोन्सा) यांच्या ‘कोंकणी काव्यें : रूपां आनी रूपकां’ या समीक्षात्मक पुस्तकाला पुरस्कार प्राप्‍त झाला आहे.

कोंकणी काव्यें : रूपां आनी रूपकां’ या कोकणी कवितेवरील समीक्षात्मक पुस्तकाला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी प्रस्तावना दिली आहे. पेर्नाळ यांचे आतापर्यंत सात काव्‍यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

पेर्नाळ यांना यापूर्वी २०१८ मध्ये विश्‍‍व कोंकणी प्रतिष्ठानचा ‘विमला पै’ कविता पुरस्कार तसेच २०१९ मध्ये कविता ट्रस्टचा ‘माथाईस कुटूम’ कविता पुरस्कार मिळाला आहे. ते ‘किटाळ डॉट कॉम’ ही कोकणी वेब पत्रिका चालवित असून त्याचे संपादक आहेत.

तसेच ‘आरसो’ या मासिकाचे ते प्रकाशक आहेत. तर, वैयक्तिक आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवासाचे प्रभावी चित्रण असलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेमुळे राजू बाविस्कर यांना हा सन्मान मिळाला आहे.

निवडक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते

बांगला : श्रेष्ठ कबिता (कविता) - प्रसून बंडोपाध्याय. इंग्रजी : क्रिमसन स्प्रिंग (कादंबरी) - नवतेज सारना. गुजराती : भट्टखडकी (कविता) - योगेश वैद्य. हिंदी : जीते जी इलाहाबाद (संस्मरण) - ममता कालिया. कन्नड : दडा सेरिसु तंदे (कथा) - अमरेश नुगडोणी. मल्याळम् : मायामानुष्यर (कादंबरी) : एन. प्रभाकरन. संस्कृत : प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (कविता) : महामहोपाध्याय साधु भद्रेशदास.

असे आहे पुरस्काराचे स्‍वरूप

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. २०२५ च्या पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT