Marathi Rajbhasha Sahitya Sammelan: दुसरे 'मराठी राजभाषा साहित्य संमेलन' होणार साखळी येथे! अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आग्रही भूमिका मांडली जाणार

Gomantak Marathi Academy Literary Conference 2025: ‘गोमंतक मराठी अकादमी’ आणि ‘मराठी असे आमुची मायबोली’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे मराठी राजभाषा साहित्य संमेलन साखळी येथे रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
 मराठी राजभाषा साहित्य संमेलन
मराठी राजभाषा साहित्य संमेलनCanva
Published on
Updated on

Sanquelim to Host Second Marathi Rajbhasha Sahitya Sammelan

पणजी: ‘गोमंतक मराठी अकादमी’ आणि ‘मराठी असे आमुची मायबोली’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे मराठी राजभाषा साहित्य संमेलन साखळी येथे रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे समन्वयक प्रकाश भगत यांनी दिली आहे.

संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी साखळी येथील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात मराठीप्रेमींची बैठक घेण्यात आली. साखळी शहरात मध्यवर्ती असलेल्या राधाकृष्ण देवस्थानाच्या सभागृहात हे संमेलन एकमताने घेण्याचे ठरले. सदर संमेलनासाठी कार्याध्यक्ष म्हणून शिवानंद बाक्रे, स्वागताध्यक्ष म्हणून अशोक घाडी यांची निवड करण्यात आली. यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपसमित्या पुढील बैठकीत काढण्यात येणार आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पुढील प्रक्रिया म्हणजे मराठीला राजभाषेचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आग्रही भूमिका मराठी राजभाषा साहित्य संमेलनात मांडली जाणार आहे. मराठीला राजदरबारी सन्मानाची वागणूक मिळावी, हा या संमेलनामागचा मुख्य हेतू आहे.

 मराठी राजभाषा साहित्य संमेलन
Goa Drugs Case: खळबळजनक! गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा दावा

या बैठकीला प्रकाश य. भगत, बाहुबली शेंदूरे, शिवानंद बाक्रे, बाबली कांदोळकर, महादेव गावस, दामोदर मळीक, रामानंद नार्वेकर, विनोद पोकळे, अशोक घाडी, अशोक लोटलीकर हे हजर होते. सर्वांनी आपले विचार मांडले व संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्याप्रकाश य. भगत यांनी स्वागत केले तर शिवानंद बाक्रे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com