Tambadi Surla Dainik Gomantak
गोवा

Tambadi Surla: ‘तांबडीसुर्ल’ला पर्यटकांना द्यावे लागणार कचरा शुल्क! एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

Sacorda Panchayat: साकोर्डा पंचायतीच्या महसुलात वाढीसाठी येत्या एप्रिलपासून तांबडीसुर्ल येथील पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला कचरा शुल्क आकारले जाणार.

Sameer Panditrao

Waste fee at Tambadi Surla

तांबडीसुर्ला: साकोर्डा पंचायतीच्या महसुलात वाढीसाठी येत्या एप्रिलपासून तांबडीसुर्ल येथील पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला कचरा शुल्क आकारले जाणार असून त्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उपसरपंच शिरीष देसाई यांनी सभेत दिली.

सचिव संदीप हल्यालर यांनी गतवर्षांचे १ कोटी ६९ लाख ९४ हजार रुपयाचे अंदाजपत्रक सभेत सादर केले. सभेतील उपस्थित सभासदानी अंदाजपत्रकास मान्यता दिली.या अंदाजपत्रकात अनेक सार्वजनिक कामासाठी ८५ लाख ३० हजारांची तरतूद केली असून पथदीप खरेदी करणे, पथदीपांची दुरुस्ती आणि विस्तार करणे, संकीर्ण या कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

तसेच सार्वजनिक स्वच्छता, स्वास्थ्यासाठी १० लाख ५ हजार रुपये तरतूद केली आहे.गटारांची देखभाल करणे, कचऱ्यांची विल्हेवाट लावणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, सार्वजनिक स्थळांची साफसफाई करणे, वैद्यकीय शिबिर, नवीन गटारांची बांधणी करणे, संकीर्ण या कामांची यादी निश्चित करण्यात आली आहे.

उपसरपंच शिरीष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली.पंचसदस्य संजना नार्वेकर, महादेव शेटकर, जितेंद्र कालेकर,निरीक्षक आरती गावस यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सभेला सात पैकी तीन पंचसदस्य अनुपस्थित होते. शिरीष देसाई यांनी स्वागत केले.जितेंद्र कालेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस! ‘रोमिओ' लेन ठरली ‘डेथ' लेन

Partgali Math: पर्तगाळ वर्धापनदिन सोहळ्याची सांगता! मान्यवरांची उपस्थिती; विद्याधीश तीर्थ स्वामीजींचे आशीर्वचन

Goa Live News: हडफडे आग दुर्घटना: 'प्लास्टिक सर्जरी' विभागात दाखल 3 रुग्णांची प्रकृती स्थिर; आठवडाभरात मिळणार डिस्चार्ज

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

SCROLL FOR NEXT