Sacorda: साकोर्डा परिसरात पाणीप्रश्न गंभीर! निष्क्रिय अधिकाऱ्यांविरुद्ध हल्लाबोल; तोडगा न काढल्यास मोर्चाचा इशारा

Sacorda Water Problem: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील कुंभारवाडा व ओडकरवाडा गावात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
Sacorda Water Problem
Sacorda Water Problem Dainik Gomantak
Published on
Updated on

Sacorda Drinking Water Issue

तांबडीसुर्ला: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील कुंभारवाडा व ओडकरवाडा गावात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून याला सर्वस्वी धारबांदोडा पाणी विभागाचे निष्क्रीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप विद्यमान पंचायत सदस्य महादेव शेटकर यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी समस्यांवर तोडगा न काढल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला आहे.

शेटकर म्हणाले की, कुंभारवाडा येथे जिल्हा पंचायत निधीतून बांधलेली जुनी विहिर आहे.तिला मुबलक पाणी साठा नसल्याने पंप बंद करावा लागतो. तिचा अजूनही विस्तार न केल्याने परिसरातील लोकांना पुरेसा पाण्याचा साठा मिळत नाही. त्यामुळे लोकांना पाणी कमी पडते आहे. ज्यावेळी विहिरीचे बांधकाम केले होते, तिथे सरकारची जुनी यंत्रणा असल्याने त्याचा विपरित परिणाम पाणी व्यवस्थापनावर होत असतो. लोकांची संख्या जास्त व पाण्याची उपलब्धता कमी, असे समीकरण येथे झालेले आहे.

Sacorda Water Problem
Water Sports NOC: गोव्यात जलक्रीडा उपक्रमांना एनओसी आवश्‍यक; मंत्री खंवटेंनी केला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

या परिसरातील लोकांना शिवडे-धारबांदोडा येथील पाणी प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी संबंधित गावाना पुरवण्यात येत आहे.या प्रकल्पातून कुंभारवाडा व ओडकरवाडा गावाला रोज किती पाणी पुरवठा करण्याचे प्रयोजन असून किती पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, याची खातरजमा केली जाते का, या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना काहीच महिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Sacorda Water Problem
Mahadai Water Dispute: कर्नाटक अजूनही म्हादईचं पाणी पळवतयं का? कळसा-भांडुराची पाहणी करणार सभागृह समिती; बैठकीत ठरलं

पाणी पुरवठ्यात अडचणी येत असल्याने लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी लोकांना त्रास सोसावा लागत आहे.

गृहिणींना पाण्यासाठी अधिक त्रास सोसावा लागतो. दैनंदिन कामेही पाण्याच्या कमतरतेमुळे रखडतात. ग्रामस्थांत यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे नाराजी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com