Sacorda panchayat gramsabha  Dainik Gomantak
गोवा

Sacorda: साकोर्डा ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक! निधीच्या विषयावरुन जोरदार खडाजंगी; सचिवाकडून मात्र उत्तर देण्यास नकार

Sacorda panchayat gramsabha: विपिन नाईक म्हणाले, की ग्रामसभेत उपस्थित असलेला प्रशांत नाईक यांनी मला धमकी दिली असून त्याविरुद्ध मी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: गेल्या रविवारी तहकूब झालेली साकोर्डा ग्रामसभा आज पुन्हा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. निधीत अफरातफर झालेल्या आरोपावर सचिव संदिप हल्ल्याळे यांच्यावर प्रश्नांची फैरी झाडण्यात आल्या. त्यावर सचिवाने माझ्यावर गटविकास कार्यालयात पंचांनी तक्रार दाखल केली असून मी ग्रामसभेत उत्तर देऊ शकत नसल्याचे सांगितले.

याआधी, ५ लाख ७४ हजारांच्या खर्चावरून गेल्या रविवारीही सुद्धा ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली होती. ग्रामस्थांनी या खर्चाचा तपशील सविस्तर द्यावा, अशी मागणी करत सरपंच संजना नार्वेकर आणि सचिव संदीप हल्ल्याळे यांना धारेवर धरले होते.

वाढता गोंधळ पाहून सरपंचांनी ग्रामसभा तहकूब केली होती. त्यानंतर (ता. १२) झालेल्या ग्रामसभेत सरपंच संजना गांवकर यांनी सचिवाने आपल्याजवळ सातही वॉर्डातील ‘ओटीपी’ मागितले तेव्हा आपण ते दिली. ‘व्हाउचर’वर जी नावे आहेत त्याबद्दल काहीही माहिती नाही नसल्याचे सांगितले.

पोलिसही उपस्थित

ग्रामसभा अर्ध्यावर सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिवाला सभागृहाबाहेर जाण्यास ग्रामस्थांनी मज्जाव केला. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कुळे पोलीस उपनिरीक्षक निबांळकर आपल्या फौज फाट्यासह उपस्थित होते.

माझ्याविरुद्ध षडयंत्र

आमच्या पंचायत मंडळच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही. सचिव यांनी जो पंचायत निधीचा गैरवापर केला आहे त्याविरुद्ध आम्हीच गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. १७ रोजी गटविकास अधिकाऱ्याने सुनावणी ठेवली असून त्यानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे. मी जिल्हा पंचायत निवडणुकीत उभा राहणार असल्याने या लोकांनी माझ्याविरुद्ध चालविलेले एक षडयंत्र आहे, असे पंच शिरीष देसाई यांनी आज सांगितले. दुसरीकडे, विपिन नाईक म्हणाले, की ग्रामसभेत उपस्थित असलेला प्रशांत नाईक यांनी मला धमकी दिली असून त्याविरुद्ध मी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस! ‘रोमिओ' लेन ठरली ‘डेथ' लेन

Partgali Math: पर्तगाळ वर्धापनदिन सोहळ्याची सांगता! मान्यवरांची उपस्थिती; विद्याधीश तीर्थ स्वामीजींचे आशीर्वचन

Goa Live News: हडफडे आग दुर्घटना: 'प्लास्टिक सर्जरी' विभागात दाखल 3 रुग्णांची प्रकृती स्थिर; आठवडाभरात मिळणार डिस्चार्ज

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

SCROLL FOR NEXT