गोव्यात दोन रशियन मॉडेलची आत्महत्या Dainik Gomantak
गोवा

गोव्यात रशियन मॉडेलच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारली

या महिलांच्या मृत्यूबद्दल रशियन दूतावासाला कळविल्याचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: हळदोणातील तरूणीचे मृत्यू प्रकरण अजून ताजे असतानाच ओशेलमध्ये दोन रशियन (Russian Women) महिलांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे बार्देश तालुका हादरा आहे. रशियन मॉडेल आलेक्झेंड्रा री डिजावी (24) आणि एकातिरोना टिटोवा (34) या दोघींच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद हणजूण पोलिस (Police) ठाण्यात झाली आहे. एकाच दिवशी आणि तासाभराच्या अंतराने ओशेलात हे प्रकार उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हणजूण पोलिसांनी या प्रकरणात ओशेल पंचायत क्षेत्रातील वेगवेगळ्या वाड्यांवर मृत झालेल्या या महिलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवले होते. त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांचे कुटुंबीय आल्याशिवाय यासंदर्भातील कोणतीही माहिती उघड करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. या महिलांच्या मृत्यूबद्दल रशियन दूतावासाला कळविल्याचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले.

हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घुबलावाडा-ओशेल येथून शिवोली आरोग्य केंद्रावर 24 वर्षीय आलेक्झेंड्रा या तरुणीचा मृतदेह 108 रुग्णवाहिकेद्वारे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ आरोग्य केंद्राकडे धाव घेऊन पंचनामा केला. रशियन मॉडेल क्षेत्रात कार्यरत असलेल्या आलेक्झेंड्रा हिला तिच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक यश न मिळाल्यामुळे तिच्या मन:स्थितीवर विपरीत परिणाम झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ती ओशेलमध्ये मित्रासमवेत वास्तव्य करून होती. मात्र, अस्वस्थ होऊन अधूनमधून ती आपल्याच हाताची बोटे चावत असे, तसेच नखे खात होती, असे स्थानिकांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारली

ओशेलमध्ये मृत्यू पावलेल्या रशियन महिलांचा शवचिकित्सा अहवाल सध्या राखून ठेवण्यात आल्याची माहिती हणजूण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज गावस यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. रशियन दुतावासाला यासंदर्भात कळविले असून मृत महिलांचे नातेवाईक गोव्यात येताच शवचिकित्सा अहवाल त्यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. या घटनांमागे कुठल्याही प्रकारचा घातपात असल्याची शक्यता गावस यांनी नाकारली आहे.

पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष

  • रशियन मॉडेल आलेक्झेंड्राने गळफास घेऊन संपवले जीवन.

  • एकातिरोनाने पहाटेपर्यंत मद्यप्राशन केल्याने झोपेतच तिचा मृत्यू.

  • पोलिसांना शवविच्छेदन अहवाल प्राप्त

मित्र बाहेर गेल्याचे पाहून संपवले जीवन

मित्र दुपारी साडेतीनच्या सुमारास घराबाहेर पडल्याचे पाहून आलेक्झेंड्रा हिने स्वयंपाक घरात साडीच्या मदतीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, बंदीरवाडा-ओशेल येथे एका घरात पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एकातिरोना टिटोवा या अन्य एका रशियन महिलेचा मृतदेह ती राहात असलेल्या खोलीत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याची चौकशी केली. एकातिरोनाने आपल्या मैत्रिणीसोबत गुरुवारी पहाटेपर्यंत मद्यप्राशन केल्यानंतर ती झोपी गेली. मात्र, झोपेतच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारच्या या घटनेने गावातील लोकांना धक्का बसला आहे. स्थानिक रहिवाशांनी घरात परदेशी भाडेकरू ठेवता्ना योग्य कागदपत्रांची शहानिशा करावी. हणजूणचे पोलिस याबाबतीत रितसर तपास करीत आहेत.

- वंदना नार्वेकर, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

SCROLL FOR NEXT