Goa: सिओलीम गावात 2 रशियन महिलांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मागील काही महिन्यापासून गोव्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन्ही प्रकरणे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही प्रकरणे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.Dainik Gomantak

पणजी: उत्तर गोवा (North Goa) जिल्ह्यातील सिओलीम (In the village of Siolim) गावात गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन रशियन महिला (Two Russian women) घरात मृतावस्थेत आढळून आल्याने (Found dead) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

24 वर्षीय अलेक्झांड्रा जावी गुरुवारी रात्री उशिरा तिच्या घरात पंख्याला लटकलेली आढळली, तर 34 वर्षीय एकटेरिना टिटोवा शुक्रवारी तिच्या अपार्टमेंटमध्ये मृत आढळली. या दोन्ही महिला गोव्यात भाड्याच्या घरात राहत होत्या.

दोन्ही प्रकरणे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
Goa Crime: तरुणीच्या गुढ मृत्यूचा गुंता वाढला

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटोवाच्या शरीरावर जखमेच्या खुणा नाहीत. दोन्ही प्रकरणे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

गोवा हे रशियन प्रवाशांसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. रशियन पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मोरझिम आणि अरंबोलच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ सिओलीम गाव आहे. तेथे परदेशी पर्यटक वास्तव्यास असतात. मागील काही महिन्यापासून गोव्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com