Murder Case: याही तरूणीची ‘वासंती’ होऊ देऊ नका!

मडकई येथील वासंती गावडे या युवतीचा मृतदेह बांबोळी येथील खुरसाकडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
Murder Case
Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: 19 वर्षीय तरूणीचे मृत्यू प्रकरण (Murder Case) आत्महत्या नसून तो खूनच आहे, अशा प्रतिक्रिया गोव्यात (Goa) उमटत असताना गेली 30 वर्षे माहिलांवरील अत्याचारांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या ‘बायलांचो एकवोट’ (Bailancho Ekvott) या संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी सुरवातीला पोलीस तपास भरकटल्याने वासंती गावडे आणि अंगणा शिरोडकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाची जशी वाट लागली तसे याही तरूणीच्या मृत्यू प्रकरणाचे होऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती केली आहे.

मडकई येथील वासंती गावडे या युवतीचा मृतदेह बांबोळी येथील खुरसाकडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. वासंतीला शेवटी महानंद नाईक बरोबर पाहिले होते, असे तिच्या भावाने सांगितले होते. असे असतानाही पोलिसांनी हा मृत्यू आत्महत्या असल्याचे गृहीत धरून तपास केला. शेवटी 14 वर्षांनी महानंदला पकडल्यावर हा खुनाचा प्रकार असल्याचे पुढे आले होते. महानंदनेच खून केल्याचा आरोप असलेल्या दीपाली जोतकर हिच्या मृत्यू प्रकरणाची नोंदही पोलिसांनी बुडून मृत्यू अशी केली होती.

Murder Case
Murder Case: बस कंडक्टरला माहिती देणे पडले महाग!

2002 साली मडकई येथे तनुजा नाईक या युवतीची गोळ्या झाडून हत्या केली होती. 2003 साली म्हापसा येथे अंगणा शिरोडकर या युवतीचा असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. तनुजा प्रकरणात एका स्थानिकावर वहिम असताना एका कामगाराने हा खून आपण केला अशी कबुली दिल्याने त्या कामगाराला पकडण्यात आले, पण पोलिसांना काहीच पुरावे न सापडल्याने न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन त्याला निर्दोष मुक्त केले, तर अंगणा शिरोडकर प्रकरणात दोन स्थानिकांवर संशय व्यक्त केला, पण नंतर पोलिसांनी त्यांना अटक केलीच नाही. त्यामुळे अंगणाचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यामागे कोण होते, हे सत्य उजेडात आलेच नाही.

पोलिस दडपणाखाली

तरूणीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास भरकटला असून पोलीस कुठल्यातरी दडपणाखाली हा तपास करत आहेत, असे वाटते त्यामुळे आता न्यायालयाने हस्तक्षेप करून आपल्या देखरेखीखाली तज्ज्ञांकडून हा तपास करून घ्यावा, अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.

Murder Case
Murder Case: हा तर नियोजित हल्ला? कुटुंबियांना ‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’ का दिला नाही?

"मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे. कुठल्याही युवतीचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी डॉक्टरांचे पॅनल नेमून करावे अशी सूचना यापूर्वी केली होती. सिद्धी नाईक हिची शवचिकित्सा करताना हा नियम पाळला गेला की नाही याचीही चौकशी करावी."

- आवदा व्हिएगस, अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com