Taleigao Rottweiler Bites two children  Dainik Gomantak
गोवा

Taleigao Rottweiler Bite: ताळगावात चिमुरड्या भाऊ-बहिणीवर रॉटवेलर कुत्र्याचा हल्ला; चेहरा, छाती, मान, कवटीला दुखापत

इव्हिनिंग वॉकवेळी प्रकार; बंगल्याच्या गेटबाहेर पडलेल्या कुत्र्याचा थेट हल्ला

Akshay Nirmale

Taleigao Rottweiler Bite News: ताळगाव येथील शिवनगर-अल्टो-ओइटियंट येथील उच्चभ्रू वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी सुमारास रॉटवेलर प्रजातीच्या श्वानाने दोन मुलांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. ही दोघेही मुले भावंडे असून पाच ते सात वयोगटातील आहेत.

यात मुलाच्या चेहऱ्याला, कानाला आणि छातीला दुखापत झाली आहे, तर मुलीच्या कवटी आणि मानेमध्ये कुत्र्याचे दात लागले आहेत. या घटनेनंतर मुलांची आई हतबल झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हा कुत्रा एका बंगल्याच्या कंपाऊंडमधून बाहेर पडला आणि त्याने थेट लहान मुलांवर हल्ला केला. मुलाच्या कानासह चेहऱ्याला आणि छातीलाही दुखापत झाली. तर मुलीच्या कवटी आणि मानेमध्ये दात लागले आहेत.

दोन्ही जखमींना अपघातग्रस्त वॉर्ड 138 मध्ये हलवले आणि रात्री उशिरा त्यांना टाके टाकण्यासाठी पुन्हा कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आणण्यात आले. रात्री 11.30 पर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.

ही लहान भावंडे आईसोबत संध्याकाळी फिरायला बाहेर पडली होती. या मुलांच्या आईने सांगितले की, मुलांचा आरडाओरडा ऐकून मी धावत आले तर कुत्र्याने मुलीची मान धरली होती. तिने आणि इतर दोघांसह कुत्र्याच्या मालकाने कुत्र्याला खेचण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा कुणाच्याही नियंत्रणात नव्हता.

पोलिस आल्यावर कुत्र्याच्या मालकाचे प्रतिनिधी म्हणून आलेले लोक माफी मागून आणि पीडितांचा वैद्यकीय खर्च उचलण्याची ऑफर देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत होते.

जखमी भावंडांना जीएमसीमध्ये हलविण्यात आले आहे. अधिकृत तक्रार आल्यास कुत्र्याच्या मालकावर कायदेशीर कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, ताळगावच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याला बचाव पथकासह पंचायत कार्यकर्त्यांमार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यात स्वयंसेवी संस्थेच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. भविष्यात असे भयानक प्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT