Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

Seema Haider Baby Boy Birth 2026: उत्तरप्रदेशातील रबूपुरा येथे राहणारी पाकिस्तानी सीमा हैदर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली.
Seema Haider Baby Boy Birth 2026
Seema HaiderDainik Gomantak
Published on
Updated on

Seema Haider Baby Boy Birth 2026: उत्तरप्रदेशातील रबूपुरा येथे राहणारी पाकिस्‍तानहून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली असून यावेळी निमित्त आहे तिच्या घरी आलेल्या एका छोट्या पाहुण्याचे. मंगळवारी (17 फेब्रुवारी) सीमाने एका खासगी रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती चांगली असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. सचिन मीणा आणि सीमाच्या घरी मुलाचा जन्म झाल्याची बातमी समजताच जल्लोष करण्यात आला. शेजाऱ्यांना मिठाई वाटण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने साधारण अकरा महिन्यांच्या अंतराने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. यापूर्वी 18 मार्च 2025 रोजी तिने एका मुलीला जन्म दिला होता. आता मुलाच्या जन्मानंतर सीमाला एकूण सहा मुले झाली आहेत. यामध्ये तिच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजे गुलाम हैदरची चार मुले आहेत, तर सचिन मीणासोबतची ही दुसरी अपत्यप्राप्ती आहे. पाकिस्तानमधून (Pakistan) भारतात येताना सीमा आपल्या चार मुलांसोबत नेपाळमार्गे भारतात आली तेव्हापासून ती ग्रेटर नोएडा येथे सचिनसोबत राहत आहे.

Seema Haider Baby Boy Birth 2026
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

सीमा आणि सचिनची ओळख एका ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाली होती, ज्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. सीमाचे भारतात येणे आणि त्यानंतर निर्माण झालेला कायदेशीर पेच हा विषय बराच काळ राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा ठरला. तपास यंत्रणांनी तिची चौकशी केली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला जामीन मंजूर झाला. सध्या सीमा आणि सचिन हे दोघेही एका सामान्य कुटुंबाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करत असून सोशल मीडियावर ते सक्रिय असतात.

Seema Haider Baby Boy Birth 2026
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच केली लिंगबदल शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

विशेष म्हणजे, सीमा आणि सचिन यांचे यूट्यूबवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवरही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ते नियमितपणे आपल्या दैनंदिन जीवनातील व्हिडिओ आणि कौटुंबिक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी स्वतःचे नवीन घर देखील बांधले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आता मुलाच्या आगमनामुळे त्यांच्या आयुष्यात एक नवा आनंद आला असून स्थानिक नागरिक आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com