'ऑस्ट्रेलियात आम्ही भांडी घासली!' लाहोरमध्ये पोहोचताच पाकिस्तानी कर्णधारानं मांडली व्यथा; पाकड्यांचा निलाजरेपणा पुन्हा जगासमोर उघड

Pakistan Hockey Team Captain Allegations: ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर लाहौर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संघाचा कर्णधार शकील अम्माद भट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर गंभीर आरोप केले.
Pakistan Hockey Team Captain Allegations
Pakistan Hockey Team Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Hockey Team Captain Allegations: पाकिस्तानच्या राष्ट्रीय हॉकी संघाचा नुकताच झालेला ऑस्ट्रेलिया दौरा हा पाकिस्तानमधील क्रीडा प्रशासनाच्या दुरवस्थेचे सर्वात मोठे उदाहरण ठरला. एफआयएच प्रो लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गेलेल्या या संघाला मैदानावर तर पराभवाचा सामना करावा लागलाच, परंतु मैदानाबाहेर त्यांना ज्या अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले, ते वाचून जगभरातील क्रीडाप्रेमी थक्क झाले आहेत. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर लाहोर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संघाचा कर्णधार शकील अम्माद भट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासे केले.

शकीलने अत्यंत उद्वेगाने सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तानी खेळाडूंना चक्क हॉटेलमधील भांडी घासावी लागली आणि स्वयंपाकघर साफ करावे लागले. खेळाडूंनी मॅच खेळायला जाण्यापूर्वी ही कामे केली, तर त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा कशी ठेवता येईल, असा संतप्त सवाल त्याने उपस्थित केला. इतकेच नाही तर फेडरेशनच्या नियोजनातील अभावामुळे खेळाडूंना कित्येक तास रस्त्यावर भटकावे लागले.

Pakistan Hockey Team Captain Allegations
IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

सिडनी विमानतळावर पुढील प्रवासासाठी खेळाडूंना 13-14 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. जेव्हा संघ कॅनबेरा येथील हॉटेलवर पोहोचला, तेव्हा तिथे समजले की फेडरेशनने पैसे न भरल्यामुळे बुकिंगच झालेले नाही. अशा वेळी स्थानिक पाकिस्तानी नागरिकांनी मदत केली म्हणून खेळाडूंना डोक्यावर छप्पर मिळाले.

फेडरेशनने केवळ 10 दिवसांसाठी 'एअरबीएनबी' बुक केले होते, मात्र संघाला तिथे 13 दिवस मुक्काम करायचा होता. उर्वरित दिवसांसाठी खेळाडूंना कोणत्याही सुविधा नसलेल्या एका स्वस्त हॉटेलमध्ये हलवण्यात आले. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तान क्रीडा बोर्डाने हॉटेलच्या खर्चासाठी फेडरेशनला 1 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला होता, परंतु हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कर्णधाराने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत हे विद्यमान व्यवस्थापन बदलले जात नाही, तोपर्यंत खेळाडू खेळ सुरु ठेवू शकत नाहीत.

Pakistan Hockey Team Captain Allegations
IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, या सर्व मानसिक त्रासाचा परिणाम खेळावरही दिसून आला. पाकिस्तानला (Pakistan) ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरुद्धच्या सर्व सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चौकशीचे आदेश दिले असून क्रीडा मंडळाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. राष्ट्रीय खेळाडूंसोबत झालेल्या या वागणुकीमुळे संपूर्ण जगात पाकिस्तानच्या क्रीडा प्रशासनाची बदनामी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com