Goa Monsoon Update 2023 File Photo
गोवा

Goa Monsoon Update 2023: पावसामुळे मडगावातील रस्त्यांची दुर्दशा; वाहनचालक त्रस्त

अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: सध्या राज्यात पावसामुळे सर्वत्र धुमशान घातले आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मडगावमध्ये गेल्याच वर्षी रस्त्यांचे काम करण्यात आले होते. मात्र हेच रस्ते पावसामुळे पूर्ण खराब झाले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम खात्याला हे रस्ते पुन्हा एकदा दुरुस्त करावे लागणार आहेत.

पेट्रोल पंपाजवळील क्लब हार्मोनियाजवळून मडगाव शहरात येण्यासाठी रस्त्याचा झालेली वाईट अवस्था पाहून वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असली तरी PWD ने खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्वरीत हालचाल केली नाही तर हा रस्ता अपघात प्रवण होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

“दररोज पडणाऱ्या पावसाने रस्ता वाहून जात आहे. ताबडतोब दुरुस्त न केल्यास, संपूर्ण रस्ता वाहून जाऊ शकतो आणि रस्त्यावर वाहन चालवणे कठीण होऊ शकते", असे मत एका दुचाकीस्वाराने व्यक्त केले.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोडा केपे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे मडगाव - केपे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मार्ग वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT