Road asphalting  Dainik Gomantak
गोवा

Panaji: ..भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण! नागरिकांना आश्चर्याचा धक्का; पणजीत चर्चा रंगली

Panaji Nevginagar Road: गतवर्षी डांबरीकरण केलेले रस्ते उखडल्याने कंत्राटदाराकडून पुन्हा करून घेतले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार काही रस्त्यांचे डांबरीकरण करून घेण्यात आले.

Sameer Panditrao

पणजी: पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि सकाळपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कोणतेही कामे करण्यात त्याचा अडथळा आला.परंतु पणजी शहरातील नेवगीनगरातील रस्त्याचे डांबरीकरण सकाळी पावसातही केले जात होते.

यावरून डांबरीकरणाची घाई कंत्राटदाराला झाली होती की, राज्य सरकारला झाली आहे हेच काही न कळण्यासारखे आहे, अशी चर्चा या भागात सुरू होती.

पावसात डांबरीकरण करण्याचे प्रकार आता सर्रास घडताना दिसत आहेत. चार दिवसांपूर्वी पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चच्या बाजूने मळ्यात व बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण पाऊस सुरू असतानाही करण्यात आले होते.

मंगळवारी सकाळी नेवगीनगर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात सुरू झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. स्थानिकही याबाबत आश्‍चर्य व्यक्त करीत होते.

गतवर्षी डांबरीकरण केलेले रस्ते उखडल्याने कंत्राटदाराकडून पुन्हा करून घेतले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार काही रस्त्यांचे डांबरीकरण करून घेण्यात आले. परंतु अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर कित्येक वर्षे डांबरीकरणाचा थर पडला नव्हता, तो यावर्षी पडला.

नेवगीनगर येथील पणजी-सांताक्रूझ रस्त्याची अवस्था अगोदरच बिकट झाली होती, अनेक ठिकाणी भूमिगत मलनिस्सारण वाहिनीसाठी केलेले चेंबरच्या जागेवरील खड्डे व्यवस्थित भरले गेले नसल्याने रस्ता ओबडधोबड बनला होता. त्या रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्यक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: चिखली पंचायत सिग्नलजवळ 'पॅशन प्रो' बाईकला आग; वाहतूक काही काळ विस्कळीत

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT