Dairy Farming Dainik Gomantak
गोवा

Dairy Farming: गायी-म्हशी पाळणे झाले महाग; सुक्या चाऱ्यासाठी धावाधाव, सत्तरीतील दुग्धव्यवसाय अडचणीत!

Sattari Dairy Farming Challenges: पूर्वी गायी-म्हशी दिवसभर माळरानावर चरून सायंकाळी गोठ्यात परतत असत. त्यामुळे पशुखाद्यावरील खर्च कमी होत असे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यात पूर्वी ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक घरात गायी-म्हशींचे संगोपन केले जायचे. त्याकाळी गावांमध्ये उघडी माळराने, राने उपलब्ध असल्याने जनावरांना नैसर्गिक व पोषणमूल्ययुक्त चारा सहज मिळत असे. त्यामुळे दुग्धव्यवसाय हा ग्रामीण कुटुंबांच्या आवडीचा आणि उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत होता. मात्र, बदलती परिस्थिती, वाढता पशुखाद्य खर्च, मजुरांची कमतरता आणि औषधोपचारांचा खर्च यामुळे सध्या हा व्यवसाय करणे आव्हानात्मक बनले आहे.

पूर्वी गायी-म्हशी दिवसभर माळरानावर चरून सायंकाळी गोठ्यात परतत असत. त्यामुळे पशुखाद्यावरील खर्च कमी होत असे. मात्र, आता ग्रामीण भागातील शेतजमिनींना कुंपणे घातल्यामुळे जनावरांना चरण्यासाठी मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत. त्यांना गोठ्यात बांधून ठेवावे लागते. जंगलातही जनावरांना पुरेसा पोषक चारा मिळत नाही. अनेक शेतजमिनी ओसाड बनल्याने तेथील चाऱ्याचाही उपयोग होत नाही.

परिणामी, सत्तरीतील दूध उत्पादकांना दरवर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आठ ते दहा महिने पुरेल एवढे नैसर्गिक सुके करड गवत खरेदी करून साठवावे लागते. मात्र, एवढ्या चाऱ्यात जनावरांची पोषणाची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे सरकी पेंड, भुसा, मका चुनी आणि मुरघास यांसारखे पशुखाद्यही परराज्यांतून खरेदी करावे लागते. या खाद्यपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने उत्पादन खर्चात भर पडत आहे.

दुसरीकडे गोव्यात पर्यटन व्यवसाय, इस्पितळे, बेकरी आणि घरगुती वापरामुळे दुधाची तसेच दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे. मात्र, स्थानिक दूध उत्पादन आणि एकूण मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याने शेजारील राज्यांतून दूध आयात करावे लागते. स्थानिक उत्पादन वाढविण्यासाठी सरकारकडून दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी अनुदान आणि प्रतिलिटर दूध अनुदान दिले जाते. त्यामुळे सत्तरीतील दूध उत्पादकांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळत आहे. तरीही वाढता उत्पादन खर्च, मजूर समस्या आणि चाऱ्याची अनुपलब्धता यामुळे दुग्धव्यवसाय टिकविणे शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दुग्धव्यवसाय करीत आहे. गोठ्यात लहान-मोठ्या मिळून ४५ म्हशी असून, त्यापैकी १५ सध्या दूध देतात. सकाळी ३० ते ३५ लिटर, तर सायंकाळी १५ ते २० लिटर दूध उत्पादन होते. तार येथील म्हादई दुग्ध सोसायटीसह खासगी ठिकाणी दुधाची विक्री केली जाते. प्रतिलिटर ४८ ते ४९ रुपये दर मिळतो. मात्र, पशुखाद्य व औषधोपचारांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे दुधाला योग्य दर व दर्जेदार पशुवैद्यकीय सुविधा मिळाल्यास युवकही या व्यवसायाकडे वळतील.

- मोहीत उसपकर, धावे-सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO 4 Big Changes: आता पीएफ काढणे होणार सोपे! यूपीआय सुविधा, शिथिल नियम आणि निवृत्तीचे हप्ते; जाणून घ्या 4 मोठे बदल

Swayampurna Skill Fair: 'महिला स्वावलंबी झाली की संपूर्ण कुटुंब सक्षम होते'; मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन

Egypt Fuel Tanker Fire: भरधाव टँकर पलटी होऊन भडकली आग, क्षणात होत्याचे नव्हते झाले! इजिप्तमधील भीषण अपघातात 30 जणांचा होरपळून मृत्यू VIDEO

Viral Video: असा बॉस प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळावा! गेम खेळण्यासाठी CEO ने संपूर्ण ऑफिसलाच दिली सुट्टी; 4 लाख लाइक्सची अट ठेवली, पण मिळाले तब्बल 16 लाख!

Santa Cruz Panchayat Fertiliser Scam: सांताक्रूझ खत घोटाळा प्रकरणी सरपंच, माजी सचिवांवर एफआयआरचे आदेश; पोलिसांना न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT