पणजी : गोव्यात अपघातांचं सत्र सुरुच आहे. रविवारी रात्री उशिरा कुचेली म्हापसा येथे प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये रिक्षा कलंडल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
म्हापशाजवळच असलेल्या कुचेली गावात रविवारी रात्री अपघात पाहायला मिळाला. रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली, ज्यात चालक गंभीर जखमी झाला. कुचेली येथील पुलावर हा प्रवासी रिक्षाचा अपघात झाला आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पावसामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असल्याचं दिसत आहे.
गोव्यात काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते निसरडे झालेत, तर काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्यांमुळे अपघातांची शक्यता बळावली आहे. गोव्यात अजूनही काही भागात खराब रस्ते असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्याचा अंदाज न आल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.
दरम्यान नुकताच कुडतरी येथे रुग्णवाहिका आणि स्कोडा कार यांची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. या रुग्णवाहिकेत एका रुग्णासह परिचारिका आणि रुग्णाचा नातेवाईक होता. त्या सर्वांना बाहेर काढल्यावर रुग्ण वाहिकेने पेट घेतल्याने सुदैवाने अनर्थ टळला. मात्र या अपघातात ती परिचारिका किरकोळ जखमी झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.