विजेच्या खांबाला अज्ञात वाहनाची धडक

खांब रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा, परिसरात घबराट
Electricity Poll Collapsed in Goa
Electricity Poll Collapsed in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मंडोपा-नावेली येथे वीजेच्या खांबाला अज्ञाताची धडक बसल्याने वीज खांब कोसळल्याची घटना घडली आहे. उच्च दाबाच्या वाहिनीच्या वीजेच्या खांबाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे विजेच्या तारांचं जाळं रस्त्यावर कोसळलं. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

Electricity Poll Collapsed in Goa
मडगाव परिसरात धोकादायक वीज खांब!

मडगावजवळील मंडोपा नावेली येथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी असलेल्या खांबाला एका वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की विजेचा खांब रस्त्यावर कोसळला. खांबासह विजेच्या ताराही रस्त्यावर आल्या होत्या. विजेच्या तारांमुळे मुख्य रस्ताच वाहतुकीसाठी बंद झाला होता. दुचाकी चालकांनी जीव धोक्यात घालत आपला मार्ग काढण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र चारचाकी वाहनांचा यामुळे खोळंबा झाला. वीज खाते आणि कंत्राटदाराकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Electricity Poll Collapsed in Goa
Sonsodo Fire : सोनसोडो कचरा यार्डाला पुन्हा आग

दरम्यान मडगाव परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत वीज खांब असून काही खांबाखाली असलेले बॉक्सही उघडेच आहेत. त्यामुळे या खांबापासून नागरिकांना धोका उत्पन्न होऊ शकतो. तसेच हे खांब कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. ही धोकादायक यंत्रणा दुरूस्ती करण्याची मागणी, ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

या ठिकाणी भूमिगत वीज यंत्रणा कार्यन्वित असून 2007 मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली होती, पण हे काम पाच वर्षांनी पूर्ण करण्यात आले. यावेळी फेकण्यात आलेली काही वीज उपकरणे मडगाव परिसरात जीर्णावस्थेत आहेत. वीज खात्याच्या या प्रकाराबाबत ग्रामस्थांत नाराजी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com