Republican Party Of India

 

Dainik Gomantak

गोवा

धारगळ परिसरात रिपब्लिकन पक्षाची कोपरा बैठक

काही युवक युवतींचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

दैनिक गोमन्तक

मोरजी: देऊळवाडा - धारगळ येथील समाज मंदीर सभा मंडपात नकतीच ऑल इंडीया रिपब्लिकन पक्ष (Republican Party Of India) - गोवा (Goa) प्रदेशाची कोपरा बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन समाजातील काही युवक युवतींनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.

यावेळी रिपब्लिकन पक्ष पेडणे (Pernem) तालुकाध्यक्षपदी सिधार्थ धारगळकर यांची तर पेडणे तालुका महिला अध्यक्षपदी गायत्री धारगळकर यांची सर्वानूमते निवड करण्यात आली .

तसेच गीलांजली धारगळकर , लतीशा धारगळकर , नेहा धारगळकर , वासुदेव म्हापसेकर , सिधार्थ धारगळकर व गायत्री धारगळकर या सर्व युवक युवतींनी ऑल इंडीया रिपब्लिकन पक्षामद्ये प्रवेश केला . पक्षात प्रवेश केल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे लतीशा धारगळकर हिने सांगितले . तर आता बहुजन समाजातील तळागाळातील लोकांचे सरकार दरबारी प्रश्न मांडून सोडवणार असल्याचे वासुदेव म्हापसेकर यांनी सांगितले . तसेच इतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले .

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड . आनंद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशात व्यापक व गतीने वाढत असल्याचे प्रदेशाध्यक्ष वारखंडकर म्हणाले . सर्व जाती (Cast) धर्माचे लोक रिपब्लिकन पक्षामद्ये (Republican Party) प्रवेश करत असल्याचे राज्य सरचिटणीस नामदेव धारगळकर म्हणाले .

या कोपरा बैठकीत पक्षाचे सरचिटणीस नामदेव धारगळकर , हेमंत चोपडेकर , उमेश कोरगावकर , तारक पार्सेकर , मुकेश पार्सेकर , लाला धारगळकर आणि रघुवीर कोरगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पक्ष प्रवेश कार्यकम्राला ऑल इंडीया रिपब्लिकन पक्ष - गोवा प्रदेश कार्यकारीणी व इतर सभासदांनी तसेच कार्यकर्त्यांनी खूप परीश्रम घेतले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT