प्रशासनाच्या दिरंगाईचा गोव्यातील विद्यार्थ्यांना फटका

दबाव वाढल्याने शाळा बंद करण्याचं जारी केलं परिपत्रक
School Closed

School Closed

Dainik Gomantak

पणजी : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने गोव्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाने केलेल्या दिरंगाईमुळे शाळकरी मुलं आजही शाळेत जात असल्याचं चित्र आहे. तज्ज्ञ समिती आणि टास्क फोर्सकडून वारंवार शाळा बंद (School Closed) करण्याच्या सूचना मिळूनही शाळा सुरुच असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

School Closed

....म्हणून विरोधी पक्षांच्या पोटात दुखतयं: प्रमोद सावंत

गोव्यात (Goa) ओमिक्रॉनचा सापडलेला पहिला रुग्ण हा एक 8 वर्षीय मुलगा होता. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्यांना या कोरोनाची झळ बसली नव्हती, ती लहान मुलंही आता त्याच्या कचाट्यात सापडत चालल्याचं स्पष्ट होत आहे. राज्य सरकारच्या (Goa Government) शिक्षण विभागाने आज 5 जानेवारी रोजी अखेर शाळा बंद करुन केवळ ऑनलाईन वर्गच सुरु ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. असं असलं तरीही गेल्या आठवड्याभरात कोरोनाचा प्रसार गोव्यात वेगाने होत आहे. याची झळ शाळकरी मुलांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

School Closed

'फक्त लसीकरणासाठीच मुलांना शाळेत बोलावता येणार'

दिलासा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण (Vaccination) 3 जानेवारीपासून गोव्यात सुरु करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी हे लसीकरण 4 दिवसांमध्ये पूर्ण करणार असल्याची घोषणा केली असली तरीही यामध्ये जास्त वेळही लागू शकतो असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशासनाने घेतलेला शाळा (School) बंद करण्याचा निर्णय खूप आधीच घेतला पाहिजे होता, असा सूरही आता उमटू लागला आहे.

School Closed

Goa: गोव्यात भाजीपाला पुन्हा महागला!

शाळा बंद करण्यावरुन वेगळे मतप्रवाह

दरम्यान शाळा बंद करण्याचा आग्रह पालकांनी फार आधीपासून धरला होता. मात्र शिक्षणतज्ज्ञांनी त्याला विरोध करत आधीच शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा केला होता. मात्र अखेर कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाला शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com