राज्यात काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातच सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीही चांगलीच कंबर कसली आहे. याच पाश्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) साखळीमध्ये भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवामध्ये बोलत आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, ''चार ते पाच दिवसांपासून आम्ही कृषी महोत्सव आयोजित करण्याचे ठरवले होते. एक दक्षिण गोव्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्याचे आम्ही ठरवले होते. कृषी महोत्सवादरम्यान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी भेट दिली होती. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा त्याचबरोबर त्यामध्ये होणाऱ्या नवनव्या प्रयोगांचा गोव्यातील नागरिकांना फायदा व्हावा यासाठी या कृषी महोत्सवाचे आयोजन (Agriculture Festival) करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना कृषी महोत्सव आयोजित केलेले पोहोचले नसेल त्यांच्यासाठी जागृतीपर विशेष अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.''
ते पुढे म्हणाले, ''राज्यात इंटीग्रेटेड कृषी योजना राबविण्यात आली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशापध्दतीने फायदा होईल याचा विचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. आधुनिक पध्दतीने बायोगॅसनिर्मिती कशी करता येईल याचाही विचार यामध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारतची घोषणा करण्यात आली आहे. याच धर्तीवर स्वंयपूर्ण गोवाची घोषणा केली. या स्वंयपूर्ण गोवाच्या (Goa) माध्यमातून राज्यातील युवक, प्रौढ त्याचबरोबर कौशल्यप्राप्त नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो.''
शिवाय ते पुढे म्हणाले, ''स्वंयपूर्ण गोवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गोवा अर्थाने विकसित होत आहे. 60 व्या मुक्तीसंग्रामाच्या दिनानिमित्त गोवा विकसीत होणाच्या दिशेने प्रगती करतच आहे. त्याचबरोबर स्वंयपूर्ण गोवाच्या माध्यमातून केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारची प्रत्येक योजना गोव्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोव्यातील प्रत्येक नागरिकांना फायदा होत असल्याने विरोधी पक्षाच्या पोटामध्ये दुखु लागले आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.