Multi-tasking staff Recruitment
Multi-tasking staff Recruitment  Dainik Gomantak
गोवा

Goa LDC Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी लोअर डिव्हिजन मध्ये नोकरीची संधी

दैनिक गोमन्तक

LDC Recruitment 2021: जर तुम्ही 12वी पास झाल्यानंतर सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करत असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गोव्यात 12वी विद्यार्थ्यांसाठी लोअर डिव्हिजन क्लर्क अर्थात LDC ची भरती (recruitment) केली जाणार आहे. गोवा सरकारच्या (Goa Government) शिक्षण संचालनालयाने निम्न विभागीय लिपिकांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. गोवा शिक्षण संचालनालयाने 29 नोव्हेंबर रोजी निम्न विभाग लिपिक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. भरती जाहिरातीनुसार, लोअर डिव्हिजन क्लर्कच्या एकूण 70 जागा भरण्यात येणार आहेत. यापैकी 43 रिक्त जागा अनारक्षित आहेत आणि 11 ST, 8 OBC आणि 8 EWS उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

लोअर डिव्हिजन लिपिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी गोवा सरकारच्या goa.gov.in वेबसाइटला भेट द्या. इच्छूक उमेदवारांना या वेबसाइटवर जावून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 देण्यात आली आहे.

लोअर डिव्हिजन लिपिक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

लोअर डिव्हिजन लिपिक पदासाठी, उमेदवार किमान 12 वी पास असावा. यासोबतच कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ऑपरेशनचे ज्ञानही त्याला असायला हवे. इंग्रजीमध्ये किमान 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती असणे आवश्यक आहे.

निम्न विभाग लिपिक पदासाठी वयोमर्यादा

निम्न विभागीय लिपिक पदासाठी उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र राज्य राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT