Ayush Ministry Recruitment: 10वी पास उमेदवारांना आयुष मंत्रालयात नोकरीची संधी

आयुष मंत्रालयात (Ayush Ministry Recruitment) अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर आहे
Ayush Ministry Recruitment
Ayush Ministry RecruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

Ayush Ministry Jobs : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने मल्टी टास्किंग स्टाफसह विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार BECIL च्या अधिकृत becil.com वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन (Online) अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर आहे. अधिसूचनेनुसार, मल्टी टास्किंग स्टाफसह एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती आयुष मंत्रालयासाठी होत आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. नुकतेच अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

BECILच्या या भरतीसाठी, सामान्य श्रेणी आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये, SC, ST, दिव्यांग आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी फक्त ऑनलाइन भरावी लागेल. डिमांड ड्राफ्ट, चेक, मनी ऑर्डर, पोस्टल ऑर्डर, पे ऑर्डर, बँकर्स चेक, पोस्टल स्टॅम्प इत्यादी मार्गाने स्वीकारली जाणार नाही.

Ayush Ministry Recruitment
पेन्सिलचा वाद मिटवण्यासाठी शाळकरी मुलांनी गाठले पोलीस स्टेशन; केली गुन्हा नोंद करण्याची मागणी

BECIL रिक्त पदांचा तपशील

  • MTS-32

  • हाऊस कीपिंग स्टाफ- 20

  • माळी-01

  • पर्यवेक्षक- 01

  • कचरा संग्राहक- 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान 10वी पास असावा. तर हाऊस किपिंग स्टाफ, गार्डनर आणि गार्बेज कलेक्टर या पदासाठी किमान पात्रता पाचवी पासची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यवेक्षक पदासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे.

Ayush Ministry Recruitment
PM Kisan Scheme: लाभार्थ्यी शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी फायदा

वेतनश्रेणी

  • MTS -17537 रु. प्रति महिना

  • हाउसकीपिंग कर्मचारी - 15908 रु. प्रति महिना

  • माळी - 15908 रु प्रति महिना

  • पर्यवेक्षक - 20976 रु प्रति महिना

  • कचरा संग्राहक - 15908 रु प्रति महिना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com