CDAC Mumbai Recruitment 2021: पात्र उमेदवारांना मिळणार 1 लाखापेक्षा जास्त पगार

CDAC Mumbai या पदांसाठी एकूण 111 रिक्त पदांची भरती केली जाणार
Centre for Development of Advanced Computing Mumbai Recruitment 2021
Centre for Development of Advanced Computing Mumbai Recruitment 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

CDAC Mumbai Recruitment 2021: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग विभागात (CDAC) मुंबई (Mumbai) येथे वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते अधिकृत वेबसाइट www.cdac.in वर जावून 9 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPM या लिंकवर जावून पुर्ण माहिती मिळवू शकतात. या पदांसाठी एकूण 111 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

Centre for Development of Advanced Computing Mumbai Recruitment 2021
ममता बॅनर्जी,आदित्य ठाकरेंची मुंबईत भेट आणि संजय राऊतांचं ट्विट

रिक्त पदांचा तपशील

प्रकल्प अभियंता – 90 पदे

प्रकल्प व्यवस्थापक – 14 पदे

वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 7 पदे या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प अभियंता आणि वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Tech किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी, उमेदवाराकडे बीई, बीटेक आणि एमसीए पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार परीक्षेमध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 50 वर्षा दरम्यान असावे. त्याचबरोबर एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनाही सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Centre for Development of Advanced Computing Mumbai Recruitment 2021
Omicron Variant: भारतीय रेल्वेही अ‍ॅक्शन मोडवर

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. पगार इत्यादींशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

या तारखा महत्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 20 नोव्हेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 डिसेंबर 2021

  • अधिकृत वेबसाइट - www.cdac.in

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com