RBL CSR Initiative: गोव्यात रत्नाकर बँकेच्या वतीने सीएसआर अंतर्गत वंचित घटकातील 250 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप केले. बँकेच्या 'उम्मीद 1000' या उपक्रमाचा एक भाग म्हणून सायकलचे वितरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सायकल आणि स्कूल-किट्सचे वाटप करण्यात आले.
नुकतेच पार पडलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले. आज (दि.13) पर्वरी येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे, आरबीएल बँकेचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आरबीएल बँकेने त्यांचा उपक्रम गोव्यात राबवत वंचित घटकातील विद्यार्थिनींना मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.
राज्यातील ग्रामीण भागात जिथे बस जात नाही, तेथील मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नाही. अशा शाळा आणि विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली व त्या माहितीच्या आधारे आज 250 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
गोव्यातील दुर्गम तालुक्यातील (सांगे, केपे, धारबांदोडा, सत्तरी) विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी प्रवासाचे साधन नसल्याने त्यांना प्रामुख्याने सायकलचे वाटप करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.