गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदा लख्ख उजळले घर आणि 'त्या' दोघांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

सातारकर आपल्या घरात रॉकेलचे दिवे लावून प्रकाश करत व त्या प्रकाशाच्या सहाय्याने त्यांच्या घरातील कामे केली जात होती.
Electricity Connection
Electricity Connection Dainik Gomantak
Published on
Updated on

अवघे जग 21 व्या शतकाकडे यशस्वी वाटचाल करत आहे. पण गोव्यातील एका घरात अजुनही वीज पोहोचली नव्हती. गोवा मुक्तीनंतर वास्को येथील सातारकर दाम्पत्याने पहिल्यांदा घरात 'उजेड' पाहिला आणि त्यांचे घर लख्ख प्रकाशाने उजळून निघाले. यावेळी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

वेळसाव येथील सातारकर दाम्पत्याच्या घरी शनिवारी पहिल्यांदा विद्युत बल्प पेटला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दाम्पत्याने आपल्या घरी प्रकाशाच्या रूपाने वीज पाहिली. सातारकर दाम्पत्य मागील अनेक दशकांपासून अंधारातच राहत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी वीज जोडणीचे आश्वासन दिले पण, वीज जोडणी काही झालीच नाही.

अलिकडेच ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम सर्वेक्षण करण्यात आले, त्यावेळी सातारकर दाम्पत्याच्या घरी वीज नसल्याचे लक्षात आले. सातारकर दाम्पत्य अतिशय गरीब असून, त्यांना वीज जोडणीसाठी अर्ज देखील करण्याबाबत पुरेशी माहिती नाही.

Electricity Connection
Mopa Police Station: चकचकीत, पॉश मोपा विमानतळाचे पोलिस स्टेशन अद्याप पत्र्याच्या शेडमध्येच

कुठ्ठाळीचे आमदार आंतोनीयो वाझ यांनी सातारकर दाम्पत्याच्या घराची पाहणी केली. सातारकर आपल्या घरात रॉकेलचे दिवे लावून प्रकाश करत व त्या प्रकाशाच्या सहाय्याने त्यांच्या घरातील कामे केली जात होती. वाझ यांनी तात्काळ या परिस्थीची नोंद घेत वीज जोडणीसाठी पुढाकार घेतला. वाझ यांनी दाम्पत्यासाठी विद्युत मीटर आणि वीज जोडणी वायर उपलब्ध करून सातारकर यांच्या घरात वीज पुरवठा सुरू केला.

दरम्यान, घरात वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर सातारकर दाम्पत्य अतिशय आनंदीत झाले व दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. वाझ यांनी देखील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, एवढी वर्षे अंधारात काढणाऱ्या सातारकर दाम्पत्याचे दु:ख मी समजू शकतो, त्यांच्या घरी वीज जोडणी मी करू शकलो याचा आनंद आहे. असे वाझ म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com