Gautam Khattar St Francis Xavier Controversy Dainik Gomantak
गोवा

गौतम खट्टरच्या अटकेसाठी वास्को - मडगावात निदर्शने, अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; माधवला 4 दिवसांची पोलिस कोठडी

Gautam Khattar St Francis Xavier Controversy: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याच्या अटकेसाठी आज वास्को आणि मडगावात निदर्शने करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को/मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याच्या अटकेसाठी आज वास्को आणि मडगावात निदर्शने करण्यात आली.

याप्रकरणी गौतम याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले असून अटकेत असलेला त्याचा भाऊ माधव याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.

गौतम खट्टरला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शेकडो रहिवासी टिळक मैदानावर जमले आणि त्यांनी वास्को पोलिस स्टेशनच्या दिशेने मोर्चा काढला.

हिंदू देवतांचा अवमान;एकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोशल मीडियावर हिंदू देवतांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ‘गोंयची नारी शक्ती’ संस्थेच्या निशा वेर्णेकर यांनी काल तक्रार केली होती.

त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित बाबिट फर्नांडिस याने जाणूनबुजून आणि हेतूपुरस्सर हिंदू देवतांना लक्ष्य करणारा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला. या कृत्यामुळे तक्रारदाराच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोन समुदायांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला आहे. म्हापसा पोलिसांनी बाबिट फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT