Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये काल सायंकाळी झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे अवघ्या काही सेकंदांत शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले.
Venezuela Earthquake
VIDEODainik Gomantak
Published on
Updated on

कॅराकस: व्हेनेझुएलामध्ये काल सायंकाळी झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे अवघ्या काही सेकंदांत शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. नागरिकांच्या डोळ्यांसमोर त्यांची हक्काची घरे आणि टोलेजंग इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. या आकस्मिक आपत्तीमुळे हजारो नागरिकांनी आपली संपूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढली.

घरे उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या कॅराकसचे रहिवासी रॉबर्टो डमास यांनी आपला अनुभव सांगितला. ‘‘भूकंपाची शक्ती इतकी प्रचंड होती की इमारत अक्षरशः एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हादरत होती. ते संपूर्ण चित्र मनाचा थरकाप उडवणारे होते. जमीन हलत होती आणि आम्हाला धड चालताही येत नव्हते. आमच्या अपार्टमेंटमधील सर्व काही उद्ध्वस्त झाले; पण सुदैवाने आम्ही जीव वाचवून बाहेर पडू शकलो,’’ असे ते म्हणाले.

Venezuela Earthquake
Earthquake: पहाटे 5 वाजता सुटले मृत्यूचे वादळ! फिलीपाईन्समध्ये 11 मिनिटांत दोन भूकंपाचे मोठे धक्के; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण Watch Video

जपानला भूकंपाचा मोठा धक्का

जपानच्या उत्तर किनारपट्टीला गुरुवारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे जपानच्या हवामान विभागाने स्पष्ट केले.

जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इवातेच्या पूर्व किनारपट्टीवर हा भूकंप झाला. सुरुवातीला याची तीव्रता ७.२ नोंदविण्यात आली.

भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५० किलोमीटर खोलीवर होता. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (यूएसजीएस) सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी नोंदवली.

भूकंपाचे सौम्य धक्के टोकियोमध्येही जाणवले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही, अशी माहिती सरकारचे मुख्य प्रवक्ते मिनोरू किहारा यांनी दिली.

Venezuela Earthquake
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात भूकंपाचा महातांडव! 235 मृत्यू, 39 हजार नागरिक बेपत्ता; ढिगाऱ्याखालून येताहेत किंकाळ्या

पंतप्रधान सानाए तकाइची यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सेंदाई, मोरिओका या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

संकटाची तीव्रता

कॅराकसजवळील मायकेतिया येथील ‘सायमन बोलिव्हार’ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रचंड नुकसान झाल्याने ते वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आले आहे.

राजधानी कॅराकसव्यतिरिक्त मिरांडा, ला ग्वायरा, अरागुआ, कॅराबोबो आणि फाल्कन या राज्यांना या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

संपूर्ण बाधित भागातील रेल्वे आणि मेट्रोसेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, मदतकार्यात अडथळे येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com