Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Merces AI Traffic Signal: मेरशी येथील महत्त्वाच्या चौकात बसविण्यात आलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित वाहतूक सिग्नल यंत्रणा गुरुवारी सायंकाळी बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
Goa Traffic Jam
Goa Traffic JamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मेरशी येथील महत्त्वाच्या चौकात बसविण्यात आलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित वाहतूक सिग्नल यंत्रणा गुरुवारी सायंकाळी बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. गर्दीच्या वेळेतच सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने सर्व दिशांनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आणि वाहनचालकांची गैरसोय झाली.

मेरशी चौक हा पणजी-मडगाव, फोंडा-पणजी तसेच इतर महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा वाहतुकीचा प्रमुख दुवा आहे. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास सिग्नल यंत्रणा अचानक बंद पडल्याने चौकातील वाहतूक विस्कळीत झाली. पणजीहून मडगावकडे जाणारी तसेच फोंडा आणि मडगावहून पणजीच्या दिशेने येणारी वाहने मोठ्या प्रमाणावर अडकून पडली. वाहतुकीची कोंडी वाढत गेल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Goa Traffic Jam
Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

काही वाहनचालकांनी स्वतःहून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली. कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांतून घरी परतणाऱ्या नागरिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसला. संबंधित यंत्रणेत निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेरीस सुमारे अर्ध्या तासानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली आणि वाहनांच्या रांगाही कमी होऊ लागल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com