Goa Teacher Recruitment: 760 जण 'सीबीटी-2' साठी पात्र, यादी जाहीर; 390 जणांची होणार भरती

Teacher Recruitment: राज्‍यातील सरकारी मराठी आणि कोकणी शाळांमध्‍ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्‍यासाठी कर्मचारी भरती आयोगाने घेतलेल्‍या सीबीटी–१ परीक्षेनंतर सीबीटी–२ साठी पात्र ठरलेल्‍या ७६० जणांची यादी आयोगाने जारी केली.
Goa teacher recruitment CBT 2 qualified candidates list 2026
Goa teacher recruitment CBT 2 qualified candidates list 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील सरकारी मराठी आणि कोकणी शाळांमध्‍ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्‍यासाठी कर्मचारी भरती आयोगाने घेतलेल्‍या सीबीटी–१ परीक्षेनंतर सीबीटी–२ साठी पात्र ठरलेल्‍या ७६० जणांची यादी आयोगाने जारी केली आहे. या शाळांमध्‍ये ३९० पदे भरण्‍यात येणार आहेत.

मराठी शाळांतील शिक्षकांची पदे भरण्‍यासाठी घेण्‍यात आलेल्‍या सीबीटी–१ मध्‍ये उत्तीर्ण ठरून सीबीटी–२ साठी पात्र ठरलेल्‍यांत खुल्‍या वर्गातील ५५३, अनुसूचित जमातीतील (एसटी) ४४, इतर मागासवर्गीयांतील (ओबीसी) ५०, अनुसूचित जातीतील (एससी), ७, आर्थिक मागास गटातील (ईडब्‍ल्‍यूएस) ५ आणि क्रीडा गटातील एका उमेदवाराचा समावेश आहे.

तर, कोकणी शाळांतील शिक्षक भरतीसाठी घेण्‍यात आलेल्‍या सीबीटी–१ मधून खुल्‍या गटातून ६७ आणि ओबीसींमधून ३३ उमेदवार सीबीटी–२ साठी पात्र ठरलेले आहेत.

Goa teacher recruitment CBT 2 qualified candidates list 2026
Goa Politics: केजरीवालांबाबत भाजपकडून दिशाभूल! वाल्मिकी नाईक यांची आमदार साळकर यांच्‍यावर टीका

दरम्‍यान, राज्‍यातील सरकारी मराठी आणि कोकणी शाळांमध्‍ये पूर्णपणे शिक्षकांची मोठ्या प्रमाणात वाणवा भासत होती. त्‍यामुळे रिक्त पदे भरण्‍यासंदर्भातील प्रस्‍ताव शिक्षण खात्‍याने कर्मचारी भरती आयोगाला सादर केलेला होता. त्‍यानुसार आयोगाने यासंदर्भात सीबीटी–१ घेतली असून, सीबीटी–२ परीक्षाही लवकरच घेण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pre Primary Teachers Salary Hike
Cyber Fraud
Visakhapatnam School Student Death Case
Teachers role in shaping new generation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com