8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

DA Hike July 2026 Central Government Employees: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.
DA Hike July 2026 Central Government Employees
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

DA Hike July 2026 Central Government Employees: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. परंतु, हा आयोग लागू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी एक मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. जुलै 2026 मधील डीए रिव्हिजनची (DA Revision) वेळ जवळ आली असून, देशातील महागाईच्या ताज्या आकडेवारीने कर्मचाऱ्यांच्या आशा अधिक पल्लवीत केल्या आहेत. केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र वाढती महागाई पाहता जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात 2 ते 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचा आढावा घेत असते. वाढत्या महागाईपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा देणे हा या भत्त्याचा मुख्य उद्देश आहे. डीएची गणना प्रामुख्याने 'कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स' च्या आधारे केली जाते. देशात 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अद्याप लागू न झाल्यामुळे, सध्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या रचनेनुसारच महागाई भत्त्याचा लाभ मिळत राहील.

DA Hike July 2026 Central Government Employees
8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

मे 2026च्या आकडेवारीनुसार देशात महागाईचा दबाव स्पष्टपणे जाणवत आहे. एकूण ग्राहक महागाई दर 3.48 टक्क्यांवरुन वाढून 3.93 टक्के झाला. तसेच ग्रामीण भागातील महागाई 3.74 टक्क्यांवरुन 4.25 टक्क्यांवर आणि शहरी भागातील महागाई 3.16 टक्क्यांवरुन 3.53 टक्क्यांवर पोहोचली. अन्नधान्याची महागाई देखील 4.20 टक्क्यांवरुन 4.78 टक्के नोंदवली गेली. ही वाढती आकडेवारी आगामी महागाई भत्त्यात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

DA Hike July 2026 Central Government Employees
8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. सरकारने एप्रिल 2026 मध्ये जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या 2 टक्के डीए वाढीला मंजुरी दिली होती, ज्यामुळे हा भत्ता 58 टक्क्यांवरुन 60 टक्के झाला होता. आता पुढील बदल जुलै 2026 पासून लागू होणार आहे. दुसऱ्या बाजूला, 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचारी संघटनांनी किमान वेतन वाढवणे, भत्त्यांमध्ये सुधारणा आणि पेन्शनशी संबंधित अनेक मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत.

DA Hike July 2026 Central Government Employees
8th Pay Commission: थकबाकीची 'जॅकपॉट' ऑफर! कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार १४ लाख रुपये? पाहा काय आहे संपूर्ण गणित

मात्र, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लक्ष जुलै महिन्यातील डीए वाढीवर केंद्रित झाले असून, आगामी काळात CPI-IW ची आकडेवारी अशीच राहिल्यास कर्मचाऱ्यांना (Employees) 8व्या वेतन आयोगापूर्वीच एक मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com