Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

India Operation Amistad for Venezuela: भारताने व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी तातडीने 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु केले.
India Operation Amistad for Venezuela
Operation AmistadDainik Gomantak
Published on
Updated on

India Operation Amistad for Venezuela: व्हेनेझुएलामध्ये गुरुवारी (25 जून) आलेल्या 7.5 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. देशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ आलेल्या या भूकंपामुळे राजधानी कराकाससह अनेक भागांत हाहाकार माजला. या कठीण प्रसंगी भारताने व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी तातडीने 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु केले.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी (26 जून) या विशेष मोहिमेची घोषणा केली. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय हवाई दलाची दोन सी-17 (C-17) विमाने लष्कराचे एक फील्ड हॉस्पिटल आणि 35 टनांपेक्षा जास्त मदत सामग्री घेऊन व्हेनेझुएलासाठी रवाना झाली आहेत.

India Operation Amistad for Venezuela
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात भूकंपाचा महातांडव! 235 मृत्यू, 39 हजार नागरिक बेपत्ता; ढिगाऱ्याखालून येताहेत किंकाळ्या

परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मदत मोहिमेत जीवनावश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आणीबाणीच्या परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी डिझाइन केलेले दोन 'भीष्म क्यूब' समाविष्ट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, भारताच्या (India) वतीने सर्व संभाव्य मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी भूकंपग्रस्तांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या. भारताच्या या तत्परतेबद्दल व्हेनेझुएलाच्या कार्यवाहू राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले असून, संकटाच्या काळात भारताने दाखवलेली ही एकजुटता दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले.

India Operation Amistad for Venezuela
Venezuela Earthquake: काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! भीषण भूकंपानं व्हेनेझुएला उद्ध्वस्त; 10 हजार मृत्यूंची भीती VIDEO

दरम्यान, व्हेनेझुएलातील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 235 वर पोहोचली असून, 4300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तिथले आरोग्य मंत्री कार्लोस अल्वारॅडो यांनी सांगितले की, अनेक जखमींना तातडीने शस्त्रक्रियेची गरज आहे. भूकंपग्रस्त भागात वेनेझुएलाच्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून, ढिगाऱ्यांखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

India Operation Amistad for Venezuela
America Attack Venezuela: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला ; संरक्षणमंत्र्यांचे घर अन् लष्करी तळाला केलं लक्ष्य Watch Video

भारतासोबतच अमेरिकेनेही व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार, तिथल्या सदर्न कमांडने सी-17 ग्लोबमास्टर आणि सी-130 हर्क्युलिस विमानांद्वारे मोठे मानवी मदत ऑपरेशन सुरु केले. जागतिक पातळीवरुन मिळणाऱ्या या मदतीमुळे व्हेनेझुएलाला सध्या मोठा आधार मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com