Goa Politics: केजरीवालांबाबत भाजपकडून दिशाभूल! वाल्मिकी नाईक यांची आमदार साळकर यांच्‍यावर टीका

Valmiki Naik AAP Press Conference: आम आदमी पक्षाचे (आप) राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्‍याबाबत प्रदेश भाजपकडून जनतेत दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे.
Valmiki Naik
Valmiki NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्षाचे (आप) राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्‍याबाबत प्रदेश भाजपकडून जनतेत दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

‘आप’ची याचिका न्‍यायमूर्ती स्‍वर्णकांता शर्मा यांनी फेटाळली असून त्‍याच या प्रकरणी सुनावण्‍या घेत आहेत. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलेला नसतानाही ‘आप’ हा खटला हरल्‍याचे चित्र भाजप उभे करीत असल्‍याचा दावा राज्‍य निमंत्रक वाल्मिकी नाईक यांनी केला.

Valmiki Naik
Goa Weather Update: निसर्गाचा दुहेरी खेळ: गोव्यात उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता, नागरिक हैराण

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचे प्रकरण दाखल करून घेण्‍यास कनिष्ठ न्यायालयाने नकार दर्शवला होता. या न्यायालयाने ६०० पानांच्या निवाड्यात सीबीआय अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले होते. त्‍यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. तेथे या प्रकरणाच्‍या सुनावण्‍या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा घेत आहेत.

परंतु, शर्मा यांनी दोन मुले वकील असून, ती केजरीवाल यांच्याविरोधात खटला लढणाऱ्या सरकारी वकिलांकडे काम करतात. त्‍यामुळे त्‍या योग्‍य न्‍याय देऊ शकणार का? असा प्रश्‍‍न उपस्‍थित करीत न्यायमूर्ती शर्मा यांनी या प्रकरणाचे काम पाहू नये, अशी याचिका ‘आप’ने दाखल केली होती. मात्र, त्यांनी ही याचिका फेटाळून लावल्याने आता त्याच या खटल्याचे काम पाहणार आहेत. , असे नाईक म्‍हणाले.

Valmiki Naik
Goa Weather Update: निसर्गाचा दुहेरी खेळ: गोव्यात उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता, नागरिक हैराण

चुकीचे आरोप!

केजरीवालांशी संबंधित मद्य घोटाळा प्रकरणी मंगळवारी पत्रकार परिषद घेत साळकर यांनी केजरीवालांवर विविध आरोप केले. महिला न्‍यायमूर्ती स्‍वर्णकांता शर्मा यांच्‍यावर त्यांनी चुकीचे आरोप केले. शिवाय ‘आप’च्‍या लोकसभेतील खासदारांनी महिला आरक्षणासंदर्भातील नारी वंदन अधिनियम विधेयकाविरोधात मतदान केल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com