Priol constituency  Dainik gomantak
गोवा

कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आधारावरच प्रियोळ मतदारसंघातून निवडणुकीत उतरणार

भारतीय जनता पक्षाच तिकिट आपल्याला मिळेल असा विश्‍वास आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना त्यासंबंधीची कल्पनाही आहे

दैनिक गोमन्तक

मतदारांसह (constituency) कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आधारावरच आपण प्रियोळ मतदारसंघातून येत्या निवडणुकीत उतरणार असून विजय निश्‍चित असल्याचा दावा करीत, भारतीय जनता पक्षाची (BJP) उमेदवारी मिळेल, असा विश्‍वास उद्योजक तथा स्वाभिमानी प्रियोळकरांचे उमेदवार संदीप निगळ्ये यांनी व्यक्त केला.

म्हार्दोळ येथे देवी सातेरी व देवी महालसेला नारळ ठेवून (रविवारी) संदीप निगळ्ये यांनी रीतसर प्रचाराला सुरवात केली. यावेळी प्रियोळ मतदारसंघातील दोन हजार नागरिक या प्रचार कार्यक्रमाला उपस्थित होते. संदीप निगळ्ये यांच्यासोबत प्रतिभा निगळ्ये, सतीश मडकईकर, महेश शिलकर, मंगलदास गावडे, गजानन प्रभुगावकर, गोविंद म्हार्दोळकर, उल्हास बागकर, राजेंद्र पालांडे तसेच इतर स्वाभिमानी प्रियोळकर नागरिक उपस्थित होते.

निगळ्ये म्हणाले, प्रियोळवासीयांनी आपल्यावर विश्‍वास ठेवला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहे. प्रियोळ मतदारसंघात आतापर्यंत सुमारे साडेचार हजार घरांना आणि येथील विविध वाड्यांना भेट दिली, त्यावेळेला ज्या मूलभूत सुविधा आहे, त्यापासून बहुतांश नागरिक वंचित असल्याचे आपल्याला दिसून आल्याचे निगळ्ये म्हणाले. या मतदारसंघातील काही वाड्यांवर घरापर्यंत जायला रस्ता सोडाच वाटही नाही. विकासाच्या फक्त वल्गना केल्या जात असल्याचे संदीप निगळ्ये म्हणाले. प्रियोळ मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

म्हार्दोळ पंचायत सभागृहापासून घोषणा देत संदीप निगळ्ये यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. त्यानंतर महेश शिलकर, सतीश मडकईकर व इतरांनी प्रियोळ मतदारसंघातील उमेदवारच निवडून येईल, यावेळेला स्वाभिमानी प्रियोळकरच निवडून येईल, असे स्पष्ट केले.

अन्यथा अपक्ष लढणार!

भारतीय जनता पक्षाच तिकिट आपल्याला मिळेल असा विश्‍वास आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना त्यासंबंधीची कल्पनाही आहे. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर आपण लोकांसमोर जाऊ असे संदीप निगळ्ये म्हणाले. पण तिकीट मिळाली नाही तर काय करणार असे विचारले असता, मतदार आणि कार्यकर्त्यांच्या बळावर अपक्ष म्हणून निवडणूक लढू, असे स्पष्ट मत संदीप निगळ्ये यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT