सरकारची फक्त घोषणाबाजी,राज्याचे मात्र नुकसान:ढवळीकर

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गेल्या पाच वर्षात राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकास प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले, रोजगार समस्या कायम आहे: दीपक ढवळीकर
Goa government only announce the scheme its harmful for state says MGP leader Deepak Dhavalikar
Goa government only announce the scheme its harmful for state says MGP leader Deepak Dhavalikar Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वसामान्यांच्या विकासासाठी मगो (Maharashtrawadi Gomantak Party) कटिबद्ध असून शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साहाय्यासाठी मगो सदैव तत्पर आहे. विद्यमान सरकारच्या फक्त घोषणाबाजीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असून कृती न करता फक्त आश्वासन देणाऱ्या शासनाबाबत जनतेत नाराजी आहे, असे मत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी माशेल येथे ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले आहे. (Goa government only announce the scheme its harmful for state says MGP leader Deepak Dhavalikar)

Goa government only announce the scheme its harmful for state says MGP leader Deepak Dhavalikar
फोंड्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मेळावा संपन्न

ढवळीकर पुढे म्हणाले, भाजपच्या (BJP) फोडाफोडीच्या राजकारणामुळे गेल्या पाच वर्षात राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकास प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले, रोजगार समस्या कायम आहे. प्रत्येक मतदारसंघात बेरोजगारी वाढली आहे. कोविड काळात झालेल्या नुकसानीमुळे जनतेला खूपच अडचणींना तोंड द्यावे लागले. खांडोळा, माशेलसारख्या वेगळा विकास प्रकल्प नाही. रस्ते खराब आहेत. या भागात सुसज्ज उच्च माध्यमिक विद्यालय बांधणार, नवे हायस्कूल सुरू करणार, अशी घोषणा विद्यमान आमदारांनी केली होती. पण अद्याप कुठेही त्याबाबत काम सुरू नाही. हायस्कूलचा तर पत्ताच नाही, असेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

तृणमूल’शी युती केल्यामुळे विरोधक काही अफवा पसरवीत आहेत. त्यात तथ्य नाही. कारण मगोचे अस्तित्व कायम आहे. मगोच्या कोणत्याही ध्येय धोरणाशी तडजोड केलेली नाही. ‘तृणमूलशी’ची केंद्रात साथ घेतली होतीच. राज्यात विविध पक्षांच्या युती होत आहे. तत्त्वांना तिलांजली देणाऱ्यांनी तरी तत्त्वाची भाषा करू नये, असा टोलाही दीपक ढवळीकरांनी यावेळी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com