महिला 'स्वावलंबणासाठी' सरकार कटिबद्ध

विश्वजित राणे : वाळपई नाणूस येथे मेळाव्यात लोटला महिलांचा जनसागर..
Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

महिला स्वावलंबन योजनेद्वारे महिलांना योजनेचा फायदा कसा होईल, त्या दिशेने सरकारने (Goa Government ) पाऊल टाकले आहे. ही योजना काही वर्षापूर्वी जारी करण्यात आली होती. आता ती अधिक सुटसुटीत प्रभावी झाली आहे. या योजनांद्वारे सत्तरी तालुक्यातील महिला गटांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Health Minister Vishwajeet Rane) यांनी केले आहे.

वाळपई नाणूस येथे आयोजित विविध सत्तरीतील स्वयं सहाय्य महिला गटाच्या मेळाव्यात राणे बोलत होते. मेळाव्याला हजारो संख्येने विविध स्वयं सहाय्य गटाच्या महिलांनी प्रचंड उपस्थिती लावून अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला आहे.

Vishwajeet Rane
फोंड्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मेळावा संपन्न

राणे म्हणाले, महिलांनी आजच्या घडीला आपण आत्मनिर्भर कसे होणार, त्या दिशेने कार्यरत राहिले पाहिजे. सरकार महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबवीत आहे. त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. सत्तरीत मोठ्या संख्येने महिला गट आहेत. त्यातून चळवळ झाली आहे असे राणे म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक, उपसंचालक ज्योती देसाई, वाळपई नगराध्यक्ष शेहझीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, विनोद शिंदे, छाया कडकडे, स्वाती प्रभू, केरी, जि.प. देवयानी गावस, नगरगाव जि.प. सभासद राजश्री काळे, सरपंच वंदना गावस, संतोष गावकर, नगरगाव सरपंच प्रशांत मराठे, सरपंच अस्मिता गावडे, रामनाथ डांगी आदींची उपस्थिती होती.

सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी कार्यरत असल्याचे दाखवून दिले आहे. स्वावलंबन योजना येणाऱ्या काळात गोव्याच्या विकासातील महत्त्वाचे ठरणार आहे, असे तानावडे म्हणाले.

शेहझीन शेख, रामनाथ डांगी, दिपाली नाईक आदींनी विचार मांडले. महिला व बाल कल्याण खात्याच्या उपसंचालिका ज्योती सरदेसाई यांनी सर्वांचे स्वागत के ले. सत्तरी तालुक्यातील महिला गटांना स्वावलंबन योजनेच्या मंजूरीची पत्रे वितरीत करण्यात आली. सौ. छाया कडकडे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com