मेटावाडा: गोव्यात सध्या पावसाचा हैदोस सुरु आहे. यंदाच्यावर्षी वेळेपेक्षा काहीसा लवकरच बरसात असलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचं बरंच नुकसान केलंय. कुळे मेटावाडा येथील १०७ शेतकऱ्यांच्या शेतीचं पावसामुळे मोठे नुकसान झालं असल्याची माहिती समोर आलीये आणि आता संबंधित खात्याकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी मेटावाडा राक्षस मळ्ळीकेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव म्हार्दोळकर यांनी केलीये.
गोव्यात मेटावाडा येथे शेती पिकून कापणीसाठी तयार आहे, मात्र अवकाळी आलेला पाऊस यामध्ये मोठा अडथळा बनलेला असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कापणी करता येत नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी काही मशीन सुद्धा आणून बसवली असली तरीही सतत कोसळत असलेल्या पावसामुळे ते हतबल झाले आहेत.
या भागात काही दिवसांपूर्वी प्राण्यांचा उपद्रव सुरू होता आणि प्राण्यांपासून शेतीचं रक्षण कारण्यासाठी हे शेतकरी रात्रभर शेतात झोपायचे. कष्ट करून उभी केलेली शेती पावसामुळे धोक्यात आली असल्याने आता शेतकरी घाबरले आहेत.
शेतांची कापणी कशी करावी, किंवा कापलेल्या पिकाला उन्ह कसं द्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. काही शेतकऱ्यांनी शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची अपेक्षा सोडून दिली असून आता सरकारने मदत करावी अशी मागणी ते करत आहेत.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव म्हार्दोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पिकून तयार झालेल्या शेतांची कापणी करायच्या तयारीत असतानाच सुरु झालेला पाऊस अद्याप काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि या अवकाळी पावसाने किमान ८ लाखांचं नुकसान केलंय. शेतकरी मुसळधार पावसाने त्रस्त असल्याने आता सरकारने यात लक्ष घालावे अशी अपेक्षा केली जातेय.
सुमारे ८ एकर जमिनीवर उभ्या असलेल्या या शेतीच्या नुकसानीचा फटका १०७ शेतकऱ्यांना बसलाय. कृषी विभागाकडून या जागेची पाहणी करण्यात आली असून त्यांनी मदत केली जाईल असे आश्वासन दिलं असल्याचं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव म्हार्दोळकर यांनी सांगितलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.