Goa Mansoon Update : नेत्रावळीत पुलाचा भाग कोसळला; वाहतुकीला फटका, जबाबदार कोण?

प्रशासनाने ताबडतोब पावले उचलून पुढील धोका टाळण्याची मागणी
Goa Mansoon Update
Goa Mansoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mansoon Update : जोरदार पडणाऱ्या पावसात नेत्रावळीतील पुलाला जोडून बांधलेल्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळताना वीजवाहिनी असलेला खांब नदीच्या बाजूने मातीच्या भरावासकट खाली गेल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस धोका उत्पन्न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने ताबडतोब पावले उचलून पुढील धोका टाळण्याची मागणी करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या बाजूला जलस्रोत खात्याची जलवाहिनी आहे. जमिनीअंतर्गत ही जलवाहिनी फुटल्यामुळे ती बदलण्यासाठी आठ दिवसांपूर्वी येथे खोदकाम करण्यात आले होते. पण खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी झिरपून मातीचा निचरा झाल्याने कठडा नदीत कोसळला. या कोसळलेल्या भागातच असलेला विद्युतभारित खांब मुळासकट नदीच्या पात्राच्या दिशेने सरकला. त्यामुळे ही जलवाहिनी आणि फुटली.

Goa Mansoon Update
Pravin Arlekar : हस्तकलेद्वारे महिलांना बनविणार स्वावलंबी

जलवाहिनीची दुरुस्ती करताना जलस्रोत खात्याने खोदलेला खड्डा वेळीच व्यवस्थित बुजविला असता तर पावसाचे पाणी त्या खड्ड्यात झिरपून ही घटना घडली नसती. यासंदर्भात आपण जलस्रोत खात्याला वेळीच दुरुस्ती करण्यासाठी निवेदन सादर केले होते. भुयारी वीजवाहिनीसाठी केलेले खोदकाम अशा दुर्घटनेला कारणीभूत ठरत आहे.

बुंडा वरक, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com