Goa Crop Damage: मिरची उत्पादनाला अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाईचे आश्वासन

Goa Chili Crop Damage: राज्यातील बहुतांशी भागात मिरची लागवड करण्यात येते. हरमल, पेडणे, खोला तसेच इतर भागातील मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील बहुतांशी भागात मिरची लागवड करण्यात येते. हरमल, पेडणे, खोला तसेच इतर भागातील मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु यंदा अवकाळी पावसामुळे मिरची ओली राहिल्याने बुरशी तसेच कीड लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेतकरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आशावादी आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कृषी संचालक संदीप फळदेसाई यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हा मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे मयेतील मिरची उत्पादक शेतकरी विश्‍वास चोडणकर यांनी सांगितले.

मिरची उत्पादक शेतकरी सखाराम पेडणेकर म्हणाले की, आम्हाला सरकारने नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे. परंतु काही शेतकरी असे आहेत, जे दुसऱ्याच्या जागेत लागवड करतात अशा शेतकऱ्यांना अर्ज करण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांना देखील सरकारने न्याय द्यावा, असे त्यांनी सांगितले.

Pramod Sawant
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

राज्यातील ज्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान हे प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे झाले आहे. अशा शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधी योजनेअंतर्गत सरकार मदत करेल. ज्या शेतकऱ्यांचे कृषी कार्ड नाही किंवा जे शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीत लागवड करतात अशा शेतकऱ्यांना देखील सरकार मदत करण्याचा विचार असून शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत. - संदीप फळदेसाई, संचालक, कृषी संचालनालय.

तांत्रिक कारणांमुळे नुकसान

काही शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीत मिरची लागवड करतात, त्यामुळे त्यांच्याकडे एक चौदाचा उतारा किंवा कृषी कार्ड नाही अशांना फटका बसण्याची शक्यता. काही शेतकऱ्यांचे कृषी कार्ड आहे, परंतु त्यांच्यावर मिरची लागवड करत असल्याची नोंद नाही अशांना फटका बसण्याची शक्यता.

मोठ्या प्रमाणात नुकसान, त्यामुळे लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चतुर्थीपूर्वी पावसाळ्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याला भरपाई देण्यात आली. तशाच स्वरूपात आताही नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Pramod Sawant
Goa Crime: मडगावमधून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली कर्नाटकात, आरोपीला अटक

कधी मिळणार भरपाई

मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी आधार निधी योजनेअंतर्गत भरपाईसाठी अर्ज केले आहेत, परंतु नेमकी ही भरपाई कधी मिळणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे अस्मानी संकटांनी त्रासलेल्या शेतकऱ्यांना मायबाप सरकारकडून लवकरात लवकर भरपाई मिळेल अशी आशा असून शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com