Pratima Coutinho Arrest Dainik Gomantak
गोवा

Pratima Coutinho: "मला मानसिक त्रास देण्यासाठी हा कट!!"; 'राम नाम सत्य है' प्रतिमा कुतिन्होंच्या अंगलट

Pratima Coutinho Arrest: इंधन वाढीच्या मुद्यावर निषेध दर्शविताना एका आंदोलनमध्ये प्रतिमा यांनी 'राम नाम सत्य है' असे उद्गार काढले होते

Akshata Chhatre

मडगाव: ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांना रविवार (दि. १५ डिसेंबर) रोजी मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. काँग्रेसमध्ये असताना वर्ष २०२० मध्ये एका आंदोलनात 'राम नाम सत्य है' असा उच्चार केल्याप्रकरणी मडगांव पोलिसांनी प्रतिमा कुतिन्होंना अटक केली. "मी कायद्याचे पालन करणारी नागरिक आहे आणि गोव्यातील लोकांसाठी माझा लढा कायम राहील" असे उद्गार अटकेच्यावेळी प्रतिमांनी काढले.

वर्ष २०२० मध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा असताना इंधन वाढीच्या मुद्यावर निषेध दर्शविताना एका आंदोलनमध्ये प्रतिमा यांनी 'राम नाम सत्य है' असे उद्गार काढले होते. या प्रकरणामुळे गोव्यातील हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याच्या आरोपाखाली ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांना मडगाव पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच नावेली येथून अटक केली आहे.

"मला मानसिक त्रास देण्यासाठी हा कट रचला गेला आहे, हा पीआय तुळशीदास नाईक मडगाव पोलीस ठाण्यात इतके वर्षे कसा आहे? ह्याचावर कोणाचा हात आहे?" प्रतिमा यांनी अटकेनंतर असा सवाल उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT