Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar : विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन शिकवणे गरजेचे!

वीजमंत्री सुदिन ढवळीकर : मडकईत केंद्र शाळेचा शतकोत्तर वर्ष सोहळा थाटात

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : आयुष्य आणि वेळ या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित असून वेळेचे महत्त्व जाणाल तर आयुष्यात यशस्वी व्हाल, अशी शिकवण आपल्याला मिळते. शाळा, विद्यालयातून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन शिकवले पाहिजे, असे सांगून मडकईच्या केंद्र शाळेने शंभर वर्षे पार केली ही मडकईवासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उद्‍गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

मडकईतील केंद्र सरकारी प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्ष सोहळ्याचे उद्‍घाटन वीजमंत्री ढवळीकर यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) करण्यात आले. यावेळी जि.पंचायत उत्तर गोवा मुख्याधिकारी अजय गावडे, जि.पं. सदस्य दामोदर नाईक, मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर तसेच माजी शिक्षणाधिकारी व्ही. डी. नाईक, मडकई पंचायतीचे इतर सर्व पंचसदस्य, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष सीमा गावडे, तिरुपती देवस्थानचे शिव साई व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतही मडकईच्या या केंद्र शाळेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. या शाळेत शिकून अनेकजण मोठे झाले. नव्या शिक्षण पद्धतीचे स्वागतच केले पाहिजे. अजय गावडे म्हणाले की, शाळा आणि गाव हे समीकरण विद्यार्थ्यासाठी महत्वाचे आहे. यावेळी निवृत्त तसेच शिक्षक, शिक्षिका, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते झाला. सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर, रंजना घैसास यांनी केले.

निवृत्त शिक्षकांचे विद्यार्थ्यांबद्दल कौतुकोद्‍गार!

राज्य सरकारने तसेच पालक शिक्षक संघटनेच्या सहकार्याने या शंभर वर्षांच्या शाळेचे नूतनीकरण केले आहे. या शंभर वर्षांत शाळेत शिकवलेल्या शिक्षक आणि शिक्षिकांचा सत्कार करताना त्यासाठी निवृत्त होऊन दहा बारा वर्षे झालेल्या शिक्षकांचा पत्ता मिळवून माजी विद्यार्थी संघटनेने प्रत्येक शिक्षकाला मानाने या कार्यक्रमाला बोलावले होते. त्यामुळे निवृत्त शिक्षक व शिक्षिकांनी या माजी विद्यार्थ्यांबद्दल कौतुकोद्‍गार काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT