Online Scam, Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Job Scam: अर्धवेळ नोकरीसाठी दिले 9.5 लाख, मोबाईल ॲपवरून फसवणूक; मुंबईच्या तरुणाला अटक

Goa Job Farud: अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने सायबर फसवणूक केलेल्या मुंबईस्थित जगदीश अशोक बोकोलिया (वय २६ वर्षे, रा. चेंबूर) या तरुणाला पर्वरी पोलिसांनी मुंबईत अटक केली.

Sameer Panditrao

पणजी: अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने सायबर फसवणूक केलेल्या मुंबईस्थित जगदीश अशोक बोकोलिया (वय २६ वर्षे, रा. चेंबूर) या तरुणाला पर्वरी पोलिसांनी मुंबईत अटक केली. या प्रकरणात आंतरराज्य सायबर टोळी गुंतल्याचा पोलिसांचा संशय आहे. पर्वरीतील एका रहिवाशाला या टोळीने जीपे, एटीएम अशा विविध माध्यमांद्वारे रक्कम जमा करण्यास लावून सुमारे ९.५० लाखांना गंडा घातल्याची तक्रार नोंद झाली होती.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञाताने २५ मे ते २ जून या काळात तक्रारदाराला अर्धवेळ नोकरीची ऑफर देत त्याला प्रतिरेटिंग ४० रुपये परतफेड करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करून सुरुवातीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देत ९ लाख ५० हजार १४९ रुपये देण्यास प्रवृत्त केले.

तक्रारदाराने ही रक्कम जमा केली. त्यानंतर तक्रारदाराने अज्ञात इसमाशी टेलिग्राम ॲपवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे कळताच त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पर्वरी पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३१९(२) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६-ड अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पर्वरी पोलिसांनी अनेक बँक खाती आणि फोन नंबरचे विश्लेषण केले. त्यावरून असे आढळून आले, की या गुन्ह्यात अनेक लोक सहभागी आहेत आणि तांत्रिक देखरेखीच्या आधारे एक संशयित मुंबईत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे पर्वरीचे उपनिरीक्षक अरुण शिरोडकर, कॉन्स्टेबल आकाश नावेलकर, हेमंत गावकर आणि ऋषिकेश शेटगावकर यांचा समावेश असलेले पथक २८ जून २०२५ रोजी तात्काळ मुंबईला गेले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताला अटक केली. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल परब हे या टोळीतील इतरांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT