Poriem Temple Dispute Dainik Gomantak
गोवा

Bhumika Temple Dispute: आमचो मान, आमका जाय! भूमिका देवस्थान कालोत्सवात वाद; माजिक - गावकर समाज आमने सामने

Poriem Bhumika Temple Issue: माजीक समाज देवस्थानाचे समान अधिकार देत नसल्याचा गावकर समाजाचा आरोप असल्याने हा वाद निर्माण झाला आहे

Akshata Chhatre

Poriem Bhumika Temple Dispute

पर्ये: गोव्यात सध्या कालोत्सव सुरु झाला आहे.अनेक ठिकाणी वेगेवेगळ्या दिवशी कालोत्सव साजरा केला जातो. साखळेश्वर देवस्थाना पाठोपाठ आता पर्ये सत्तरीत देखील भुमिका देवस्थानाच्या कालोत्सवाच्या दरम्यान वाद सुरु झाला आहे. माजीक समाज देवस्थानाचे समान अधिकार देत नसल्याचा गावकर समाजाचा आरोप असल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

आज (दि.१५ जानेवारी) आणि उद्या (दि.१६ जानेवारी) रोजी मंदिरात कालोत्सव साजरा केला जाईल, मात्र गावकर समाजाला सामान अधिकार मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मंदिराच्या वादात पुरुषांसह महिलावर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने भुमिका देवस्थान परिसरात वातावरण तंग झाले आहे.

सध्या पोलीस या जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र स्थानिकांचा प्रचंड चिडलेले असून "आमच्याच मंदिरात आम्हाला जाण्यापासून रोखलं जातंय, या पोलिसांना इथे आमदाराने पाठवलंय की मुख्यमंत्र्यांनी?" असा रोष व्यक्त करत आंदोलन करतायत. पर्ये भुमिका देवस्थान वाद चिघळला असल्याने पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पर्येतील वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

यापूर्वी श्री भूमिका देवी मंदीराचा राखणदार साखळेश्वरच्या पूजेवरून सुरु झालेला वाद झाला होता. पर्ये सत्तरी येथील देवस्थानाच्या वादावरून पर्येतील गावकर समाजातील लोकांनी रविवारी (२२ डिसेंबर) रोजी थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि त्यांची समस्य मांडून दाखवली होती. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कायदेशीरपणे सर्व गोष्टी सुरळीत होतील असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गावकर समाजातील लोकांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

SCROLL FOR NEXT