Paryem Temple Dispute: पर्येतील वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; 'गोष्टी सुरळीत होतील!' गावकर समाजाला आश्वासन

Cm Dr. Pramod Sawant: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कायदेशीरपणे सर्व गोष्टी सुरळीत होतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गावकर समाजातील लोकांनी सांगितले आहे.
Cm Dr. Pramod Sawant: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कायदेशीरपणे सर्व गोष्टी सुरळीत होतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गावकर समाजातील लोकांनी सांगितले आहे.
Paryem Temple DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये सत्तरी: श्री भूमिका देवी मंदीराचा राखणदार साखळेश्वरच्या पूजेवरून सुरु झालेला वाद अजूनही धुमतोय. पर्ये सत्तरी येथे सुरू असलेल्या देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर पर्येतील गावकर समाजातील लोकांनी रविवारी (२२ डिसेंबर) रोजी थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि त्यांची समस्य मांडून दाखवली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कायदेशीरपणे सर्व गोष्टी सुरळीत होतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गावकर समाजातील लोकांनी सांगितले आहे.

गावकर बांधवांना निर्णय अमान्य का?

पर्ये येथील श्री भूमिका देवीचा राखणदार साखळेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनी झालेल्या वादानंतर शुक्रवारी देवीच्या उत्सवाला बंदी घातली होती; पण त्यांनतर उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी केवळ एकाच माजिक गटासोबत बैठक घेतली आणि उत्सवावरील बंदी उठविली. हा निर्णय अंतिम निर्णय देण्याअगोदर आम्हालाही बैठकीस बोलवायला हवे होते असे म्हणत पर्येतील गावकर बांधवांनी निर्णय अमान्य केला आहे.

Cm Dr. Pramod Sawant: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कायदेशीरपणे सर्व गोष्टी सुरळीत होतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गावकर समाजातील लोकांनी सांगितले आहे.
Paryem Temple Dispute: पर्येत देवीचा जयघोष!! अखेर भूमिका देवस्थानात उत्सवाला सुरूवात

बंदी उठविल्यानंतर बैठकीला बोलावणे चुकीचे असून शासनाने एकतर्फी निर्णय दिला आहे, असे सांगत गावकर समाज बांधवांनी वाळपईचे उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली. त्यावेळी ऑर्डर बदलली नाही, तर ऑर्डरमध्ये बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे गावकर बांधव म्हणाले होते.

काय होता निर्णय?

माजिक समाजाच्या गटाने वाळपईच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांच्याशी चर्चा केली होती आणि चर्चेअंती मिश्रा यांनी परिपत्रक काढून सुरू होणाऱ्या उत्सवाला परवानगी दिली असून मंदिर बंदीचा आदेश मागे घेतला, त्यामुळे हा उत्सव सायंकाळपासून सुरू झाला. तसेच जमाव बंदीचाही आदेश मागे घेत पाचपेक्षा अधिक लोकांना येऊन उत्सव करण्यास परवानगी दिली गेली तसेच पुढील आदेश येईपर्यंत मंदिर खुले राहणार असल्याचे आदेशात म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com